शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
3
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
4
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
5
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
6
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
7
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
8
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
9
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
10
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

Nagpur: जीवघेण्या नायलॉन मांजाविरोधी मोहीम छेडा, प्र-कुलगुरू डॉ. दुधे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

By जितेंद्र ढवळे | Published: January 09, 2024 5:49 PM

Nagpur News - संक्रांतीच्या पर्वावर मोठ्या प्रमाणात पतंग उडविले जातात. यात नायलॉन मांजाचा वापर होत असल्याने विविध घटना घडत आहेत. त्यामुळे नायलॉन मांजाविरोधी सामाजिक जाणीव निर्माण करण्याचे आवाहन प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांनी केले.

- जितेंद्र ढवळे नागपूर - संक्रांतीच्या पर्वावर मोठ्या प्रमाणात पतंग उडविले जातात. यात नायलॉन मांजाचा वापर होत असल्याने विविध घटना घडत आहेत. त्यामुळे नायलॉन मांजाविरोधी सामाजिक जाणीव निर्माण करण्याचे आवाहन प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांनी केले. भौतिकशास्त्र विभागात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने नायलॉन मांजाविरोधी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी करण्यात आले. यावेळी दुधे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, ‘गाठ’ लघुपटाचे नायक मुकुंद वसुले, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ओमप्रकाश चिमणकर, एनएसएस समन्वयक डॉ. संजय ढोबळे यांची उपस्थिती होती.

डॉ. दुधे म्हणाले, सर्वच जनजागृतीचा भार सरकार, प्रशासनावर सोडून चालणार नाही. यामध्ये समाजाचा घटक म्हणून आपणा सर्वांना सहभागी व्हावे लागणार आहे. नायलॉन मांजा घेणार नाही. साध्या धाग्याने पतंग उडवू, अशी शपथ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

डॉ. अविनाश गावंडे म्हणाले, नायलॉन मांजा हा जीवघेणा असून, त्यामुळे अनेक अपघात घडत आहेत. या अपघातांसाठी आपत्ती व्यवस्थापन पथक तयार करण्यात आले असून, नोंदणी न करता आधी उपचार करण्याची सुविधा सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. गतवर्षी मांजाने अपघात झाल्याची २७ प्रकरणे आली होती. यावेळी तर महोत्सव सुरू होण्यापूर्वीच आतापर्यंत ७ घटना समोर आल्या, याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन वेंकटेश तिवारी यांनी केले. आभार प्रियंका चरडे यांनी मानले.

गाठ लघुपटाचे सादरीकरणनायलॉन मांजाचे दुष्परिणाम दर्शविणारा 'गाठ' लघुपट यावेळी दाखविण्यात आला. या कार्यक्रमाला लघुपटाचे निर्माते डॉ. महेंद्र गोहणे, दिग्दर्शक सुबोध आनंद, नायक मुकुंद वसुले, सचिन गिरी, गौरांश गोहने, प्रकाश देवा, श्रीदेवी देवा, संग्रामसिंह ठाकूर, विनय वासनिक, कांचन गोहणे, मेकअप मॅन रमेश वाटकर यांची उपस्थिती होती.

टॅग्स :nagpurनागपूर