नागपूर-काटोल हायवे होणार चार पदरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 08:31 PM2018-03-08T20:31:37+5:302018-03-08T20:31:50+5:30

केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरात रस्ते विकासाचे जाळे पसरवण्याचा सपाटा लावला आहे. यात आपले नागपूरही मागे नाही. अनेक मार्ग चारपदरी होत आहेत. नागपूर - काटोल हा महामार्ग सुद्धा आता चार पदरी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

Nagpur-Katol highway will run four lane | नागपूर-काटोल हायवे होणार चार पदरी

नागपूर-काटोल हायवे होणार चार पदरी

googlenewsNext
ठळक मुद्दे९६० कोटींचा प्रकल्प : संपूर्ण महामार्ग होणार सिमेंटचा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरात रस्ते विकासाचे जाळे पसरवण्याचा सपाटा लावला आहे. यात आपले नागपूरही मागे नाही. अनेक मार्ग चारपदरी होत आहेत. नागपूर - काटोल हा महामार्ग सुद्धा आता चार पदरी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
नागपूर ते काटोल हा एकूण ६० किमीचा मार्ग चार पदरी होणार आहे. केंद्र सरकारने याबाबत निर्णय घेतला असून राष्ट्रीय महामार्गाकडे हे काम सोपवण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याचा डीपीआर तयार केला आहे. हा संपूर्ण रस्ता सिमेंटचा होणार असून यावर ९५० कोटी रुपये खर्च येणार आहे.
जुना काटोल नाका येथून चार पदरी रस्त्याला सुरुवात होईल. सध्या या कामाच्या निविदा काढण्यात आलेल्या आहेत. जूननंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गोरेवाडा जंगल सुरक्षित : घरमालक व दुकानदारांमध्ये धास्ती
चार पदरी रस्ता हा नियमानुसार ६० मीटरचा असतो. सध्या हा ३० ते ३५ मीटरचा आहे. त्यात वाढ होणार म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूची घरे व दुकाने हटवली जातील, हे निश्चित. परंतु शहरातील दाट वस्तीमधून चार पदरी रस्ता हा ४५ मीटरचा असतो तर मोकळ्या जागेवर तो ६० मीटरचा असतो. तसेच वने हे संरक्षित क्षेत्रात येत असल्याने त्या भागातून रस्ता जात असेल तर तो ३० मीटर इतकाच असतो. आता शहरातील जुना काटोल नाक्यापासून हा रस्ता सुरू होत आहे. दरम्यान गिट्टीखदान मकरधोकडापर्यंत रस्त्याच्या बाजूला घनदाट वस्ती आहे घरे व दुकाने मोठ्या प्रमाणावर आहेत. या भागातून रस्ता ४५ मीटरचा असला तरी अनेक घरे व दुकाने अगदी रस्त्याला लागून असल्याने ते निश्चितच या रस्त्यांमध्ये येतात. फेटरीमध्येही तशीच परिस्थिती आहे. त्यामुळे रस्त्यांवरील घरमालक व दुकानदारांमध्ये धास्ती पसरली आहे. याच रस्त्यावर गोरेवाडा संरक्षित जंगलही येते. परंतु नियमानुसार तेथून ३० मीटरचा रस्ता आताच आहे. त्यामुळे जंगलाचा भाग संरक्षित राहणार आहे.
नुकसानभरपाई मिळेल
याबाबत अधिकाऱ्यांना विचारपूस केली असता त्यांनीही ही बाब मान्य केली. काही घरे व दुकाने ही अगदीच रस्त्याला लागून आहेत. त्यामुळे ती जातील. परंतु त्यांना नियमानुसार नुकसानभरपाई मिळणार आहे.
कामाच्या निविदा निघाल्या
नागपूर-काटोल हा रस्ता चार पदरी करण्याचा निर्णय मंत्रालयाने घेतला आहे. राष्ट्रीय महामार्गाला त्याचे काम मिळाले आहे. निविदा काढण्यात आल्या आहे. सध्या काम प्रोसेसमध्येच आहे. ४५ मीटर राईट आॅफ वे (रस्त्याच्या मध्यभागापासून अंतर) राहील. नुकसानीबाबतचा अद्याप पाहणी झालेली नाही. सध्या केवळ निविदा काढण्यात आलेल्या आहेत.
अभिजित जिचकार
उपमहाव्यवस्थापक (तकनिकी)
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

 

Web Title: Nagpur-Katol highway will run four lane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.