शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

रुग्णांच्या जीवावर उठले नागपूरचे विमा रुग्णालय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 11:08 PM

कोरोना विषाणूची लागण वाढत आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यातच वातावरणात बदल झाल्याने व्हायरलचे रुग्ण मोठ्या संख्येत दिसून येत आहे. असे असताना कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या राज्य कामगार विमा रुग्णालयात औषधांचा तुटवडा पडला आहे.

ठळक मुद्दे३० टक्केच औषधींचा साठा : सोनोग्राफीसह इतर यंत्रसामग्रीचाही अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूची लागण वाढत आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यातच वातावरणात बदल झाल्याने व्हायरलचे रुग्ण मोठ्या संख्येत दिसून येत आहे. असे असताना कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या राज्य कामगार विमा रुग्णालयात औषधांचा तुटवडा पडला आहे. केवळ ३० टक्केच औषधांचा साठा असल्याने बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्यांना बाहेरून औषधी विकत घेण्याची वेळ आली आहे. साध्या तापाचेही औषधे मिळत नसल्याच्या रुग्णांच्या तक्रारी आहेत. सध्याच्या स्थितीत दहा दिवस पुरेल एवढाच औषधांचा साठा असल्याने रुग्णांच्या जीवावर हे रुग्णालय उठल्याचे बोलले जात आहे.देशात दोन कोटी कामगार विमा योजनेचे सदस्य आहेत. महाराष्ट्रात ४१ लाख कामगार योजनेचे सदस्य आहेत, तर विदर्भात तीन लाख ३० हजार सदस्य आहेत. राज्याचा विचार केल्यास या कामगार रुग्णालयावर आश्रित एक कोटी ४२ लाख त्यांचे कुटुंब आहे. त्यांच्या आरोग्याची जबाबदारी कामगार रुग्णालयाची आहे. रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात रोज ६००वर रुग्ण येतात. परंतु यातील बहुसंख्य रुग्णांना औषधे नसल्याचे लिहून देऊन बाहेरुन औषधे खरेदी करण्यास सांगितले जात आहे. यावरून औषध वितरक आणि रुग्णांमध्ये भांडणे होत आहेत, तर अनेक कामगारांकडे औषध विकत घेण्याइतपत पैसे राहत नसल्याने ते उपचारापासून वंचित राहत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. यातच रुग्णालयात सोनोग्राफीपासून ते आवश्यक यंत्रसामग्रीचा अभाव आहे. मात्र शासन याकडे लक्ष देत नसल्याने न्याय कुठे मागावा, असा प्रश्न कामगारांना पडला आहे.हाफकिन कंपनीकडून अपुरा पुरवठाराष्ट्रीय मजदूर काँग्रेसचे (इंटक) राष्ट्रीय सचिव मुकुंद मुळे यांनी सांगितले, राज्य शासनाने गेल्या तीन वर्षांपासून हाफकिन कंपनीकडे औषध पुरवठ्याची जबाबदार दिली आहे. परंतु अद्यापही या कंपनीकडून औषधी पुरवठा सुरळीत झालेला नाही. कामगार रुग्णालयाला विविध ४०० प्रकारांची औषधी लागतात. परंतु आतापर्यंत कधीच त्याचा पूर्णपणे पुरवठा झाला नाही. सध्यातर रुग्णालयात सुमारे ३० टक्केच औषधांचा साठा असल्याने याचा फटका रुग्णांवरील उपचारांना बसत आहे.उपचारासाठी कामगारांच्या वेतनातून कापले जातात २१०० रुपयेकामगारांच्या वेतनातून कपात होणाऱ्या निधीतून विमा योजना चालते. केंद्र सरकारचे कर्मचारी विमा महामंडळाला एकदम सहा महिन्यांची रक्कम कामगार राज्य विमा सोसायटीला देते. प्रत्येक कामगारामागे २१०० सोसायटीला दिली जाते. यातूनच रुग्णालयाशी संबंधित अधिकारी, डॉक्टर्स, परिचारिका व कर्मचाऱ्यांचे वेतन होते. परंतु ज्यांच्याकडून पैसा मिळतो त्यांच्याच जीवावर ही सोसायटी उठली आहे, असेही मुळे यांचे म्हणणे आहे.कामगारांना औषधांचा खर्च परडवणारा नाहीकामगारांना आधीच वेतन फार कमी असते. अनेकांना नियमानुसार वेतनही मिळत नाही. तुटपुंज्या वेतनावर कसातरी आपला संसाराचा गाडा चालवितात. त्याच अपुऱ्या वेतनातून उपचारासाठी पैसे कापले जात असल्याने कामगार रुग्णालयातून दर्जेदार उपचार मिळेल, ही अपेक्षा असते. परंतु गेल्या काही वर्षात कामगार रुग्णालयालाच उपचाराची गरज असल्याचे चित्र आहे. सध्या औषधांचा तुटवडा पडल्याने कामगारांना औषधी घेऊन येण्यास सांगितले जात आहे. यामुळे अनेक रुग्ण औषधांविना राहण्याची शक्यता आहे.मुकुंद मुळेराष्ट्रीय सचिव, राष्ट्रीय मजदूर काँग्रेसचे (इंटक).

टॅग्स :hospitalहॉस्पिटलEmployeeकर्मचारी