लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उद्योजक नवनीत तुली यांनी मोठ्या प्रमाणात झोपेच्या गोळ्यांचे सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी प्राथमिक तपास केला असता तुली यांनी चुकीने झोपेच्या गोळ्यांचे सेवन केल्याचे सांगितले.नवनीत तुली प्रदीर्घ कालावधीपासून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. ते पूर्वी कॉंग्रेसचे नगरसेवक होते. त्यानंतर ते भारतीय जनता पक्षात सहभागी झाले. ते पेट्रोल पंप आणि कॉलेजचे संचालक आहेत. नुकतेच कळमेश्वर मार्गावर त्यांनी हॉटेल सुरु केले होते. सूत्रांनुसार काही काळापासून वडिलोपार्जित संपत्तीच्या वादामुळे तुली निराश होते. सध्या ते गिट्टीखदान ठाण्यांतर्गत गोरेवाडात राहतात. शुक्रवारी सायंकाळी त्यांची प्रकृती अचानक बिघडली. कुटुंबीयांनी त्यांना सदरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयाने सदर पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर तुली यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची वार्ता झपाट्याने शहरात पसरली. सदर पोलीस त्वरित रुग्णालयात पोहोचले. त्यावेळी तुली यांची प्रकृती सामान्य झाली होती. पोलिसांनी तुली यांचे बयाण नोंदविले. तुली यांनी पोलिसांना चुकीने झोपेच्या गोळ्यांचे सेवन केल्याचे सांगितले. त्यांनी पोलिसांना सांगितले की, ते दुसऱ्या गोळ्यांचे नियमित सेवन करतात. चुकीने त्यांनी दोन-तीन झोपेच्या गोळ्यांचे सेवन केले. प्रकृती बिघडल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ते रुग्णालयात आले. सदर पोलिसांनी प्रकरणाचे कागदपत्र गिट्टीखदान पोलिसांना पाठविले आहेत.
नागपुरात उद्योजक नवनीत तुली यांचा आत्महत्येचा प्रयत्न !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 23:54 IST
उद्योजक नवनीत तुली यांनी मोठ्या प्रमाणात झोपेच्या गोळ्यांचे सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी प्राथमिक तपास केला असता तुली यांनी चुकीने झोपेच्या गोळ्यांचे सेवन केल्याचे सांगितले.
नागपुरात उद्योजक नवनीत तुली यांचा आत्महत्येचा प्रयत्न !
ठळक मुद्देझोपेच्या गोळ्यांचे सेवन : रुग्णालयात सुरु आहेत उपचार