Nagpur Gram Panchayat Election Results : नागपूर जिल्ह्यात कॉंग्रेसचा गुलाल, भाजपाचीही विजयी घोडदौड !

By जितेंद्र ढवळे | Published: November 6, 2023 01:05 PM2023-11-06T13:05:46+5:302023-11-06T13:06:33+5:30

देशमुखांच्या काटोलमध्ये अजित पवार गटाने खाते उघडले, सावनेर मतदार संघात कॉंग्रेसच्या केदार यांची जादू कायम भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या कामठीत कॉंग्रेस-भाजपा फिफ्टी-फिफ्टी

Nagpur Gram Panchayat Election Results : In Nagpur district, Congress's gulal, BJP's victory too! | Nagpur Gram Panchayat Election Results : नागपूर जिल्ह्यात कॉंग्रेसचा गुलाल, भाजपाचीही विजयी घोडदौड !

Nagpur Gram Panchayat Election Results : नागपूर जिल्ह्यात कॉंग्रेसचा गुलाल, भाजपाचीही विजयी घोडदौड !

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील ३५७ ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या निकालात कॉंग्रेस समर्थित गटाच्या सरपंच पदाच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे. माजी गृहमंत्री आ.अनिल देशमुख यांच्या काटोल मतदार संघात अजित पवार गटाचे खाते उघडले आहे. मात्र तालुक्यातील बहुतांश ग्रा.पं.वर राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे सरपंच विजयी झाले आहे. भिवापूर तालुक्यातील चिखल ग्रा.पं.त शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या प्रणाली सतीष गारघाटे यांनी दमदार विजय मिळविला आहे. 

जिल्ह्यातील ३५७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ५ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी रविवारी बंपर मतदान झाले होते.

नरखेड तालुका - नरखेड तालुक्यातील २९ ग्रा.पं.साठी रविवारी मतदान झाले. यात मोगरा ग्रा.पं.च्या सरपंचपदी भापपा समर्थित गटाच्या मीनाक्षी उमेश्वर मडके विजयी झाल्या आहे. याशिवाय गोधणी गायमुख ग्रा.पं.च्या सरपंच पदी भाजप समर्थित गटाच्या मीना सुरेशसिंग सूर्यवंशी विजयी झाल्या आहे. आ.अनिल देशमुख यांचा बालेकिल्ला असलेल्या नरखेड तालुक्यातील खरसोली ग्रा.पं.मध्ये अजित पवार गटाच्या नीलिमा नरेश अरसडे विजयी झाल्या आहेत. नरेश अरसडे हे अजित पवार गटाचे काटोल-नरखेड विधानसभा मतदार संघाचे प्रमुख आहे. 

मोहदी (धोत्रा) ग्रा.पं.च्या सरपंचपदी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) राजू नाखले विजयी झाले आहेत. नारसिंगी ग्रा.पं.त भाजपच्या नलु प्रवीण काकडे विजयी झाल्या आहेत. मोहगाव (भदाडे) ग्रा.पं.च्या सरपंचपदी निर्मला जयपाल चणकापुरे व राष्ट्रवादी समर्थित ७ सदस्य विजयी झाले आहेत तर भारसिंगी ग्रा.पं.च्या सरपंचपदी स्थानिक आघाडीच्या शारदा रवींद्र धवराळ विजयी झाल्या आहेत. 

कामठी तालुका - भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांचा बालेकिल्ला असलेल्या कामठी तालुक्यात १० ग्रा.पं.साठी निवडणुका झाल्या. यात भाजप आणि कॉंग्रेस समिर्थित गटाचे सरपंचपदाचे ५ उमेदवार विजयी झाले आहेत. तालुक्यात भाजपाचा विजयरथ रोखण्यात कॉंग्रेस नेते सुरेश भोयर यांना काही अंशी यश आले आहे. 
तालुक्यातील बाबुळखेडा ग्रा.पं.च्या सरपंचपदी भाजप समर्थित गटाचे कदीर इमाम छवारे तर वारेगाव ग्रा.पं. सरपंचपदी काँग्रेस समर्थित गटाच्या रत्‍ना अजाबराव उईके विजयी झाल्या आहेत. कवठा ग्रा.पं.च्या सरपंचपदी भाजप समर्थित गटाचे निलेश श्रीधर डफरे तर नेरी ग्रा.पं.च्या सरपंचपदी भाजप समर्थित गटाच्या सुजाता सुरेश पाटील विजयी झाल्या आहेत. 

कळमेश्वर तालुका - कॉंग्रेसचे आ. सुनील केदार यांच्या सावनेर मतदार संघातील कळमेश्वर तालुक्यात कॉंग्रेस समर्थित गटाच्या सरपंचपदाच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे. येथे २१ ग्रा.पं.साठी निवडणुका झाल्या आहेत. यात बोरगाव (खुर्द) ग्रा.पं.च्या सरपंचपदी महादेव वानखेडे यांनी दमदार विजयी मिळविला आहे. ते ४५९ मतांनी विजयी झाले. याशिवाय तालुक्यातील झुनकी, भडांगी, आष्टीकला ग्रा.पं.मध्ये कॉंग्रेस समर्थित गटाने बाजी मारली आहे. तालुक्यात दहेगाव आणि सावळी (खुर्द) ग्रा.पं.मध्ये भाजपा समर्थित गटाचे सरपंच विजयी झाले आहेत.

Web Title: Nagpur Gram Panchayat Election Results : In Nagpur district, Congress's gulal, BJP's victory too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.