शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Shahana Fatima : नागपूरच्या लेकीची शिकागोत नेत्रदीपक कामगिरी; शहाना फातिमाने केली कमाल, मिळवलं मोठं यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 13:32 IST

Shahana Fatima : नागपूरच्या शहाना फातिमाची सायबरसुरक्षा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी निवड करण्यात आली आहे. 

प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या सहज शक्य करत येतात. अशीच एक कौतुकास्पद गोष्ट आता समोर आली आहे. नागपुरच्या लेकीने परदेशात कमाल केली आहे. नेत्रदीपक कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नागपूरच्या शहाना फातिमाची सायबरसुरक्षा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी निवड करण्यात आली आहे. 

अमेरिकेतील शिकागो इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इलिनॉय टेक) विद्यापीठाने प्रत्येक महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सात उत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड केली आहे. यामध्ये  शहाना फातिमाचाही समावेश आहे. शिकागो येथील इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून सायबर फॉरेन्सिक्स आणि सिक्युरिटी विषयात शहानाने मास्टर डिग्री मिळवली आहे. 

देवेंद्र फडणवीस यांच्यापासून मिळाली प्रेरणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून शहाना फातिमाला सायबरसुरक्षा क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणा मिळाली. तिने त्यावेळीचा एक किस्साही सांगितला आहे. काही वर्षांपूर्वी नागपूर येथील एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, "एक काळ असा होता जेव्हा ज्या राष्ट्रांकडे इंधनाचे साठे होते ते समृद्ध होते, पण आता ज्यांच्याकडे डेटाचे साठे असतील ते समृद्ध होतील." मुख्यमंत्र्यांचं हे वाक्य ऐकून शहानाला प्रेरणा मिळाली. 

शहानाचं भरभरून कौतुक

युरोपमधील कोसोवो येथे २०२४ मध्ये शहानाला एक महिना घालवण्याची संधी मिळाली होती. आपल्या चार सहकाऱ्यांसह तिने कोसोवोची राजधानी प्रिस्टिना येथील थ्री फोल्डर्स या मार्केटिंग कंपनीसाठी सायबरसुरक्षा पायाभूत सुविधा डिझाइन करून ती कार्यान्वित केली होती. शहाना फातिमाच्या घवघवीत यशानंतर सर्वच जण तिचं भरभरून कौतुक करत आहेत. तिच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे

टॅग्स :nagpurनागपूरInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी