शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
3
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
4
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
5
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
6
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
7
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
8
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
9
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
10
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
11
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
12
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
13
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
14
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
15
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
16
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
17
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
18
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
19
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
20
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
Daily Top 2Weekly Top 5

बिझनेसमन नवरा नको गं बाई! नागपुरच्या रितेशला १०, २० नाही तर तब्बल ५०० मुलींचा लग्नासाठी नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2021 13:39 IST

सगळं काही असून लग्न न जमणं आताच्या घडीची सगळ्यात मोठी समस्या बनली आहे. अशात एका लग्न ठरत नसलेल्या नागपूरच्या तरूणाची गोष्ट समोर आली आहे. 

सध्याच्या घडीला लग्नासाठी मुलगी मिळणं फारच कठीण झालंय. कारण शेतकरी नवरा नको, अमुक ठिकाणी राहणारा हवा, पगाराचा आकडा इतकाचं हवा, अशा वेगवेगळ्या अटी मुली आजकाल मुलांसमोर ठेवतात. यापैकी काही गोष्टी मुलाकडे नसतील किंवा वेगळ्या क्षेत्रात काम करणारा असेल तर लगेचच मुलींच्या कुटुंबाकडून नकार कळवला जातो. सगळं काही असून लग्न न जमणं आताच्या घडीची सगळ्यात मोठी समस्या बनली आहे. अशात एका लग्न ठरत नसलेल्या नागपूरच्या तरूणाची गोष्ट समोर आली आहे.

नागपुरात  एक आत्मनिर्भर तरुण शिक्षण, पैसै, गाडी, घरं सगळं काही असूनही समस्येत आहे. अर्थात याला कारणही तसंच आहे.  रितेश झुनके नावाच्या पठ्ठयाला आजवर दहा, वीस नाही तर तब्बल पाचशेपेक्षा जास्त तरुणींनी लग्नासाठी नकार दिला आहे, वाचून तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. माध्यमांशी बोलताना रितेशनं आपली व्यथा मांडलीआहे. 

२९ वर्षांत बनला ३५ मुलांचा बाप; स्पर्म डोनरनं सांगितला आपला अनुभव

नोकरीऐवजी ट्रान्सपोर्टच्या व्यवसायात आपल्या पायावर उभं राहून यश मिळवलेल्या  ४० हजार रुपये महिना कमावणाऱ्या आत्मनिर्भर रितेशने स्वतःच्या लग्नासाठी आजवर अनेक स्थळं पाहिली आणि मुलीच्या कुटुंबियांशी संवादही साधला. इतकंच नाही तर  विवाह मेळाव्यात सहभाग नोंदवले, मेट्रीमॉनियल साईट्सवर नोंदणी केली. मात्र अजूनही लग्नाला एकही मुलगी तयार झालेली नाही. नोकरीवालाच नवरा हवा असं अनेक मुलीचं म्हणणं होतं. कारण ट्रान्सपोर्टच्या व्यवसायात असलेल्या मुलींना चांगल्या सवयी नसतात असा  काहीसा त्यांचा समज आहे. या सगळ्यामुळे या तरूणाला नैराश्याचा सामना करावा लागतोय.

अति तिथे माती! बॉडी बिल्डरने इंजेक्शन घेऊन बनवले २४ इंचाचे बाय सेप्स, आता होतोय त्याला पश्चाताप...

रितेशनं एका मालवाहतूक व्यवसायाची सुरूवात केली. नोकरी सोडून स्वतःची वाहनं घेतली आणि या  व्यवसायाला कमी कालावधीतच चांगला प्रतिसाद मिळाला. आता (वेल सेट्ल्ड) रितेशच्या कुटुंबातील  सगळ्यांनीच त्याच्यासाठी स्थळ शोधण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. नोकरीवालाच नवरा हवा  या मुलींच्या दृष्टीकोनाबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यानिमित्तानं तरूणींच्या मुलांकडून असलेल्या अपेक्षांवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. कारण मुलींच्या या आग्रहापायी अनेक तरुणांवर अविवाहित राहण्याची वेळ आली आहे असं चित्र पाहायला मिळतंय.

टॅग्स :businessव्यवसायnagpurनागपूरmarriageलग्नSocial Viralसोशल व्हायरल