नागपुरात पुन्हा देह व्यापाराच्या अड्ड्यांवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 21:49 IST2018-09-21T21:45:26+5:302018-09-21T21:49:25+5:30
डीसीपी चिन्मय पंडित यांच्या कारवाईनंतर खळबडून जागे झालेल्या शहर पोलीसांनी २४ तासात एम्प्रेस मॉलसह दोन ठिकाणी सुरु असलेले देह व्यापाराचे अड्डे उघडकीस आणले.

नागपुरात पुन्हा देह व्यापाराच्या अड्ड्यांवर धाड
लोकमत न्यूज नेटवर्कट
नागपूर : डीसीपी चिन्मय पंडित यांच्या कारवाईनंतर खळबडून जागे झालेल्या शहर पोलीसांनी २४ तासात एम्प्रेस मॉलसह दोन ठिकाणी सुरु असलेले देह व्यापाराचे अड्डे उघडकीस आणले.
पहिली कारवाई गांधीसागर तलाव येथील एम्प्रेस मॉलमध्ये करण्यात आली. सामाजिक सुरक्षा शाखेला मॉलमधील पहल्या माळ्यावर असलल्या ‘सलुन अॅण्ड स्पा’मध्ये देह व्यापार चालत असल्याची माहिती मिळाली. स्पाची मालक दर्शना उर्फ खुशी अनिल धकान (३५) रा. काचीमेट वाडी आहे. पोलिसांनी धाड टाकण्याची योजना आखली. शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता डमी ग्राहक स्पामध्ये पाठवण्यात आला. खुशीने दीड हजार रुपयात एका तरुणीचा सौदा केला. ग्राहकाने इशारा करताच पोलिसांनी धाड टाकून खुशीला पकडले. स्पा मध्ये तीन तरुणी सापडल्या. एक तरुणी दिल्लीची राहणारी आहे. पोलिसांनी स्पा मधून मोबाईल, रुपये आणि रजीस्ट्रर जप्त केले. अड्ड्यावर सापडलेल्या तरुणीचा विचारपूस केल्यावर पोलिसांनी खुशीला ताब्यात घेतले. खुशीला आॅक्टोबर २०१७ मध्ये सुद्धा वाडीमध्ये देह व्यापाराचा अड्डा चालवतांना पकडले होते. सुटल्यानंतर तिने अड्डा बंद केला होता. यानंतर एम्प्रेस मॉलमध्ये स्पा च्या नावावर देह व्यापार करू लागली. तिने ५० हजार रुपये महिना भाड्याने स्पा घेतला होता.
सूत्रानुसार एम्प्रेस मॉलमध्ये अनेक दिवसांपासून देह व्यापार सुरु आहे. तीन महिन्यांपूर्वी बेलतरोडी पोलिसांनी केलेल्या कारवाईतही एम्प्रेस मॉलमध्ये देह व्यापार सुरु असल्याची बाब उघडकीस आली होती. सातत्याने चर्चा होवूनही पोलीस एम्प्रेस मॉलवर कारवाई करण्यास मागे पुढे पाहत होते.
दुसरी कारवाई झोन पाचच्या विशेष चमूने कळमना येथे सुरु असलेल्या देह व्यापाराच्या अड्ड्यावर केली. येथे एक महिला आणि आॅटोचालकास पकडले.
पोलिसांना डिप्टी सिग्नल येथील कविता बांदे ही महिला देह व्यापार चालवित असल्याची माहिती मिळाली होती. या आधारावर पोलिसांनी डमी ग्राहकाच्या माध्यमातून कविताशी संपर्क साधला. त्याने दोन हजार रुपयात तरुणीचा सौदा केला. कविताने ग्राहकास आरोपी स्वीटी बागडे हिच्या घरी जाण्यास सांगितले. कविताने आॅटो चालक शेख कलीम शेख मुनीर (३२) रा. शेखनगर खरबी याच्यासोबत तरुणीला स्वीटीच्या घरी पाठवले.डमी ग्राहकाने इशारा करताच पोलीसांनी धाड टाकून स्वीटी आणि कलीमला पकडले. त्यांच्याकडे तरुणीही सापडली.