शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मुलाच्या जेवणाचा डबा नेणाऱ्या पित्याला बोलेरोने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 23:43 IST

मुलाच्या जेवणाचा डबा घेऊन आलेल्या एका पित्याला भरधाव बोलेरोचालकाने जोरदार धडक मारली. त्यामुळे पित्याचा करुण अंत झाला. शनिवारी दुपारी १२. ३० च्या सुमारास माटे चौकाजवळच्या रिलायन्स फ्र्रेशजवळ हा भीषण अपघात घडला.

ठळक मुद्देबजाजनगरात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुलाच्या जेवणाचा डबा घेऊन आलेल्या एका पित्याला भरधाव बोलेरोचालकाने जोरदार धडक मारली. त्यामुळे पित्याचा करुण अंत झाला. शनिवारी दुपारी १२. ३० च्या सुमारास माटे चौकाजवळच्या रिलायन्स फ्र्रेशजवळ हा भीषण अपघात घडला.तुकडोजीनगर ( सुभाषनगर) येथे राहणारे देवीदास दशरथ गुडधे (वय ५२) रिक्षाचालक होते. त्यांचा मुलगा पंकज शेवाळकर गार्डनमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. ८ सप्टेंबरच्या दुपारी १२.३० वाजता गुडधे मुलाचा जेवणाचा डबा घेऊन रस्त्याने पायी जात असताना रिलायन्स फ्र्रेशच्या समोर एका भरधाव बोलेरोचालकाने त्यांना जोरदार धडक मारली. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर आजूबाजूची मंडळी धावली. त्यांचा मुलगाही आला. गंभीर जखमी झालेल्या देवीदास गुडधे यांना डॉक्टरकडे नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पंकज देवीदास गुडधे (वय २६) यांनी दिलेल्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अपघातानंतर पळून गेलेल्या आरोपी वाहनचालकाचा पोलीस शोध घेत आहेत. ही बोलेरो राखीव पोलीस दलाची असल्याचे सांगितले जाते. वृत्त लिहिस्तोवर पोलिसांकडून त्याबाबत स्पष्ट माहिती देण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. दरम्यान, मुलाला जेवू घालण्यासाठी गेलेल्या देवीदास गुडधे यांचा असा करुण अंत झाल्याने तुकडोजीनगरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू