शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

कॉपीमुक्त परीक्षेसाठी नागपूर शिक्षण मंडळ गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 20:02 IST

कॉपीमुक्त परीक्षा व्हाव्यात, पेपरफुटीचे प्रकार घडू नये यासाठी बोर्डाने अतिशय सावध पावले उचलली आहे. नियमात आणि परीक्षा प्रक्रियेत बदल घडवून आणत पेपर फुटीवर नियंत्रणासाठी सावध पाऊल उचलले आहे. बुधवार, २१ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. नागपूर बोर्डांतर्गत १७२४११ विद्यार्थी परीक्षा देणार आहे.

ठळक मुद्देविविध प्रयोगातून पेपरफुटीवर नियंत्रण : १ लाख ७२ हजार विद्यार्थी देणार परीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कॉपीमुक्त परीक्षा व्हाव्यात, पेपरफुटीचे प्रकार घडू नये यासाठी बोर्डाने अतिशय सावध पावले उचलली आहे. नियमात आणि परीक्षा प्रक्रियेत बदल घडवून आणत पेपर फुटीवर नियंत्रणासाठी सावध पाऊल उचलले आहे. बुधवार, २१ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. नागपूर बोर्डांतर्गत १७२४११ विद्यार्थी परीक्षा देणार आहे.विभागात ४५२ केंद्रावर परीक्षा होणार आहे. यासाठी ७७ परिरक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकार होऊ नये म्हणून भरारी पथकांची संख्या वाढविण्यात आली आहे. संवेदनशील केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नियंत्रणात परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या दूर व्हाव्यात व त्यांना ताण-तणावमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी, यासंबंधी काही अडचणी आल्यास माहितीसाठी समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी नागपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ८२७५०३९२५२ व ९३७११६८८४० या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हानिहाय परीक्षा केंद्र व विद्यार्थीजिल्हा      केंद्र        विद्यार्थीनागपूर  १४७           ६६८८२भंडारा   ६१               १९४१४चंद्रपूर  ७७             ३०४८८वर्धा    ४८                १८७८३गडचिरोली ४६       १४३५४गोंदिया  ७३          २२४९० विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीने फोडले जाणार पेपरआतापर्यंत कस्टोडियनमार्फत प्रश्नपत्रिकांचे सीलबंद गठ्ठे केंद्र संचालकांच्या ताब्यात दिले जात होते. केंद्र संचालकांच्या आदेशानुसार परीक्षा केंद्रात एका हॉलमध्ये ते गठ्ठे फोडले जायचे. त्या ठिकाणी परीक्षेच्या वर्गावर नेमलेल्या पर्यवेक्षकांना प्रश्नपत्रिकांचे वाटप केले जायचे. यंदापासून केंद्र संचालक २५ प्रश्नपत्रिकांची सीलबंद पाकिटे पर्यवेक्षकांना देतील. परीक्षेपूर्वी काही मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिकांचे सीलबंद पाकीट दोन परीक्षार्थींच्या स्वाक्षरीने फोडले जाणार आहे.तीन तास बसा तरच मिळेल प्रश्नपत्रिकापूर्वी विद्यार्थ्यांना पेपर सोडविल्यानंतर उत्तरपत्रिका परीक्षकाला देऊन, प्रश्नपत्रिका घरी घेऊन जाता येत होती. मोबाईल तंत्रज्ञानामुळे पेपर फुटीसारखे प्रकरण वाढल्याचे प्रकार होत असल्याने बोर्डाने यावर्षीपासून जो विद्यार्थी पूर्णवेळ बसेल, त्यालाच प्रश्नपत्रिका घरी नेता येणार आहे. विद्यार्थ्याने पेपरच्या वेळेच्या आत पेपर सोडविला तरी, त्याला प्रश्नपत्रिका घरी घेऊन जाता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता प्रश्नपत्रिका हवी असेल, तर तीन तास परीक्षा केंद्रावर बसावेच लागले. दररोज बदलणार सहा. परिरक्षकबोर्डाने कॉपीमुक्त अभियान राबविताना परीक्षा प्रक्रियेत अनेक बदल घडवून आणले आहे. त्यातील एक बदल म्हणजे सहायक परिरक्षक नियमित बदलणार आहे. पूर्वी सहायक परिरक्षक एकदा नियुक्त केला करी परीक्षा संपेपर्यंत तिथेच रहायचा. आता त्याला दररोज वेगवेगळे केंद्र मिळणार आहे. सहा. परिरक्षक यांच्याकडे केंद्रावरून पेपर घेऊन जाणे, विद्यार्थ्यांनी पेपर सोडविल्यानंतर ते संकलित करून, केंद्रावर आणणे हे काम आहे. विद्यार्थ्यांना सूचनासकाळी १० वाजता विद्यार्थ्यांनी केंद्रावर रिपोर्टिंग करावे.१०.२० पर्यंत विद्यार्थ्यांनी खोली व बैठकीची व्यवस्था शोधावी.१०.३० पर्यंत विद्यार्थ्यांनी आपल्या व्यवस्थेवर बसावे.१०.३५ ला उत्तरपत्रिकेचे वितरण करण्यात येईल.१०.४५ ला प्रश्नपत्रिकेचे वितरण होईल.११ वाजता परीक्षा सुरू होईल.

टॅग्स :educationशैक्षणिकexamपरीक्षा