शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्ती घोटाळ्याची पाळेमुळे नागपुरातही

By admin | Updated: January 6, 2017 02:23 IST

विद्यार्थ्यांचे कागदोपत्री प्रवेश दाखवून शिष्यवृत्तीच्या नावाखाली नागपुरातील अनेक संस्थांनी शासनाकडून लाखोंची रोकड उचलल्याचे स्पष्ट झाले आहे.

जरीपटक्यातील संस्थेची बनवाबनवी उघड : दुसरा गुन्हा दाखल नागपूर : विद्यार्थ्यांचे कागदोपत्री प्रवेश दाखवून शिष्यवृत्तीच्या नावाखाली नागपुरातील अनेक संस्थांनी शासनाकडून लाखोंची रोकड उचलल्याचे स्पष्ट झाले आहे. बुधवारी याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी नॅशनल स्टडी आॅफ प्रोफेशनल इन्स्टिट्यूट(भीम चौक)च्या संस्थाचालक व प्राचार्य आणि संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मंगळवारी असाच एक गुन्हा बजाजनगर पोलिसांनीही दाखल केला होता, हे विशेष! रोशन दिलीप करवाळे (वय २१, रा. आंबेडकर कॉलनी, कामठी रोड) याला नॅशनल स्टडी आॅफ प्रोफेशनल इन्स्टिट्यूटच्या प्राचार्य आणि संचालकांनी त्याचे शैक्षणिक कागदपत्रे मागितली. त्या कागदपत्रांच्या आधारे रोशनचा संस्थेत प्रवेश दाखवून त्याला कोणतेही शिक्षण न देता शासनाकडून रोशनच्या नावाखाली शिष्यवृत्ती उचलली. ५ मे २०१३ पासून सुरू असलेल्या या बनवाबनवीची माहिती उघड होताच बुधवारी, ४ जानेवारीला रोशनने पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर जरीपटका पोलिसांनी संस्थेच्या आरोपी प्राचार्य, संस्थाचालक आणि संचालकांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. यापूर्वी बजाजनगर पोलिसांनी तेलंगखेडी, रामनगरातील रहिवासी विशाल अरुण माटे या विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून कुसुमताई वानखेडे व्यावसायिक अभ्यासक्रम प्रशिक्षण केंद्राचा शिक्षक उमेश लाकडे तसेच स्वामी विवेकानंद मुख्याध्यापकासह संस्थेच्या संचालक आणि अन्य पदाधिकाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. त्यांनी विशाल आणि अन्य विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांचा वापर करून शासनाकडून लाखो रुपये अनुदान उचलले आहे. (प्रतिनिधी) लोकमतमुळे लक्षवेध : लोकमतने बुधवारी या शिष्यवृत्ती घोटाळ्याचे वृत्त ठळकपणे प्रकाशित केले. ते वाचनात आल्यामुळे अनेक संस्थांमधील विद्यार्थ्यांनी आपापल्या संस्थांमध्ये कागदपत्रांची तपासणी केली. रोशननेही याबाबत चौकशी केली तेव्हा फसवणूक उघड झाली. त्यानंतर वरिष्ठांच्या माध्यमातून तो जरीपटका ठाण्यात पोहचला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. राज्यात यापूर्वी शिष्यवृत्ती घोटाळ्याने खळबळ उडवून दिली होती. ते प्रकरण शांत झाल्यानंतर आता नागपुरात शिष्यवृत्ती घोटाळ्याचा दुसरा गुन्हा दाखल झाल्याने पुन्हा एकदा शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.