शहरं
Join us  
Trending Stories
1
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
2
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
3
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
4
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
5
नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
6
Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी?
7
मृत्यूनंतरही घरात फिरतोय पत्नीचा आत्मा, अभिनेत्याने सांगितला अनुभव म्हणाला- "अचानक कापूरचा वास आला आणि..."
8
चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
9
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक
10
श्रीराम मंदिर, ऑपरेशन सिंदूर आणि नक्षलवाद..; दिवाळीनिमित्त पीएम मोदींचे देशाला पत्र
11
ट्रम्प यांचा नवा वादग्रस्त निर्णय ! गांजा विक्रेत्याला केले अमेरिकेचा इराकमधील 'विशेष दूत'
12
Diwali Padwa 2025: दिवाळी पाडव्याला नवर्‍याने बायकोला ओवाळणी देणे, हा हक्क की कर्तव्य?
13
पुन्हा एकदा सीमापार स्ट्राईक! जोरदार ड्रोन हल्ला; भारतविरोधी 'मेजर जनरल' मारला गेला?
14
Diwali Car Offers: सर्वात कमी डाऊन पेमेंट भरुन व्हा टाटा पंच ईव्हीचे मालक, 'इतका' असेल ईएमआय!
15
Asrani Net Worth: आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले असरानी? जाणून घ्या शिक्षण आणि नेटवर्थ
16
Diwali Bonus: बोनस कमी दिला म्हणून कर्मचाऱ्यांनी केलं असं काही, काही तासांतच कंपनीचं लाखोंचं नुकसान
17
दिवाळी पाडवा २०२५: १० राशींना गुड न्यूज, समस्या संपतील; भाग्योदय-भरभराट, इच्छापूर्तीचा काळ!
18
Rishabh Pant Captain : पंत टीम इंडियाचा कॅप्टन! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी ऋतुराजलाही संधी
19
'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप

नागपूर विभागाचा निकाल राज्यात सर्वात कमी; गेल्यावर्षापेक्षा ४ टक्क्याने घसरला निकाल

By निशांत वानखेडे | Updated: May 13, 2025 16:46 IST

दहावीच्या निकालातही लेकीच भारी : ७ टक्के अधिक उत्तीर्ण

निशांत वानखेडेनागपूर : महाराष्ट्र राज्य प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि. १३) जाहीर करण्यात आला. नागपूर विभागासाठी बारावीप्रमाणे दहावीचा निकालही निराशाजनक ठरला. विभागात उत्तीर्णांची टक्केवारी ९०.७८ टक्के असून, राज्यात शेवटच्या क्रमांकावर आहे. घसरलेल्या निकालातही मुली भारी ठरल्या आहेत. ९३.३४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून, मुलांपेक्षा तब्बल ७ टक्क्याने अधिक आहेत.

यावर्षी दहावीच्या परीक्षेत नागपूर विभागातून १ लाख ४७ हजार ३५९ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली हाेती. त्यातील १ लाख ४६ हजार ११३ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी १ लाख ३२ हजार ६५० विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत. म्हणजे एकूण ९०.७८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, राज्यात नागपूर विभाग नवव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षापेक्षा यंदाचा निकाल ४ टक्क्याने घसरला आहे. गेल्यावर्षी विभागाचा ९४ टक्के निकाल लागला हाेता व राज्यात ७व्या क्रमांकावर हाेता. यंदा ९८.८२ टक्के निकालासह काेकण विभाग प्रथम क्रमांकावर आहे.

नागपूर विभागात नियमित आणि पुनर्परीक्षार्थी मिळून १ लाख ५० हजार १८६ विद्यार्थी परीक्षेला बसले हाेते. त्यापैकी ७७,५७० मुली आणि ७२,६१६ मुलींची संख्या हाेती. त्यापैकी १ लाख ३४ हजार ८५६ विद्यार्थी यशस्वी झाले, ज्यामुळे ६७,०७३ म्हणजे ८६.४६ टक्के मुले आणि ६७,७८३ म्हणजे ९३.३४ टक्के मुलींचा समावेश आहे. मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा ६.८८ टक्के अधिक आहे.

विभागात नागपूर ९४.३९ टक्क्यांवर अव्वलराज्यात शेवटून पहिला असलेल्या नागपूर विभागात नागपूर जिल्हा अव्वल ठरला आहे. नागपूर जिल्ह्याचा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल ९४.३९ टक्के आहे. जिल्ह्यात ५६,३०० विद्यार्थी परीक्षेला बसले हाेते, ज्यातील ५३,१४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुनर्परीक्षार्थी मिळून ५८,१२७ विद्यार्थी परीक्षेला बसले, ज्यापैकी ५४,३२४ उत्तीर्ण झाले. ज्यामध्ये २७,०६६ म्हणजे ९१.२२ टक्के मुले आणि २७,२५८ म्हणजे ९५.७८ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. नागपूर शहरातून परीक्षेला बसलेल्या ३०,४०६ विद्यार्थ्यांपैकी २९,०८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागातील इतर जिल्ह्यामध्ये गाेंदिया जिल्हा ९२.८४ टक्क्यासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात १६,८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. याशिवाय वर्धा १३,७९५ (८८.८६ टक्के), भंडारा १३,३४७ (८८.४८ टक्के), चंद्रपूर २४,०२५ (८८.४५) व गडचिराेली ११,४६८ (८२.६७ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

नागपूर विभाग २.६३ टक्के विद्यार्थी ९० पारनागपूर विभागात ९० टक्क्यांच्या वर ३५४८ म्हणजे २.६३ टक्के विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांच्या वर गुण घेतले आहेत. ८५ टक्क्यांवर ५६४१ म्हणजे ४.१८ टक्के, ८० टक्क्यांवर ८०८३ (५.९९ टक्के), ७५ टक्क्यांवर १०,२१२ (७.५७), ७० टक्क्यांवर ११,९७३ विद्यार्थी (८.८७ टक्के), ६५ टक्क्यांवर १३,६८६ (१०.१५ टक्के), ६० टक्क्यांवर १७,५१५ (१२.९९ टक्के) आणि ४५ टक्क्यांवर ४५,७५४ विद्यार्थी (३३.९३ टक्के) आणि ४५ टक्क्याच्या खाली १८,४४४ विद्यार्थी (१३.६८ टक्के) उत्तीर्ण झाले.

गुणपडताळणीसाठी २८ मेपर्यंत मुदतलागलेल्या निकालात विद्यार्थ्यांना काही आक्षेप असल्यास बाेर्डाच्या संकेतस्थळावर गुण पडताळणीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. विद्यार्थी १४ मे ते २८ मे २०२५ या काळात ऑनलाइन पद्धतीने अर्ज बाेर्डाकडे जमा करावे. प्रतिविषय ५० रुपये जमा करावे लागतील. उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती मागविण्यासाठी प्रतिविषय ४०० रुपये जमा करावे लागतील.

"नागपूर विभागाचा निकाल कमी असला तरी ताे गुणात्मकतेवर आधारित आहे. विभागाने काॅपीमुक्त परीक्षा अभियानाची कडकपणे अंमलबजावणी केल्यामुळे जे विद्यार्थ्यांच्या डाेक्यात हाेते, तेच उत्तरपत्रिकेवर उतरले आहे. त्यामुळे हा समाधानकारक व गुणवत्तापूर्ण निकाल हाेय."- चिंतामण वंजारी, अध्यक्ष, विभागीय शिक्षण मंडळ, नागपूर

टॅग्स :nagpurनागपूरEducationशिक्षणVidarbhaविदर्भ