शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीत एक अनार तीन बिमार; उभी फूट पडण्याची शक्यता

By कमलेश वानखेडे | Updated: January 14, 2023 11:01 IST

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक; सेनेला ऐनवेळी तिकीट दिल्याने झाडे-अडबोलेंची काँग्रेसवर आगपाखड

नागपूर : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे उमेदवार गंगाधर नाकाडे यांनी शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) एबी फॉर्म जोडल्याने काँग्रेसच्या समर्थनाच्या आशेवर असलेल्या उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. १५ जानेवारीच्या बैठकीत शिवसेनेने माघार घेतली नाही तर महाविकास आघाडीत उभी फूट पडण्याची शक्यता आहे.

शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे यांनी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस नेत्यांनी दिलेला शब्द पाळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांनी काँग्रेससोबत असलेली नैसर्गिक युती टिकावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

शिवसेनेचे उमेदवार गंगाधर नाकाडे यांनी आपणच महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचा दावा केला आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नना पटोले यांनी अद्याप जी ही जागा शिवसेनेसाठी सोडली नसल्याचा दावा केला आहे. असे असताना नाकाडे यांनी अर्जासोबत शिवसेनेचा एबी फॉर्म जोडल्याने आता नाकाडे यांना माघारी घ्यायला लावणे वाटते तेवढे सोपे नाही हे स्पष्ट आहे. असे असले तरी झाडे व अडबाले यांना दोन्ही उमेदवारांना १५ जानेवारी रोजी मुंबईत होत असलेल्या बैठकीत काहीतरी तोडगा निघेल, अशी अपेक्षा आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईच्या बैठकीत शिवसेनेने माघार घेण्याची शक्यता कमीच आहे. तसेच विदर्ब माध्यमिक शिक्षक संघ व शिक्षक भारती या दोन्ही संघटनादेखील एकमेकांना समर्थन देण्याची तिळमात्र शक्यता नाही. त्यामुळे तिन्ही उमेदवार एकमेकांविरुद्ध दंड थोपटण्याची शक्यता आहे.

ताकदीने लढू व जिंकून दाखवू

‘लोकमत’शी बोलताना राजेंद्र झाडे म्हणाले, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेच्या नेत्यांनी मला शब्द दिला होता. शब्द पाळला तर यापुढेही लोक काँग्रेसवर विश्वास ठेवतील. मात्र, महाविकास आघाडीचे नाव समोर करीत शिवसेनेच्या उमेदवाराला तिकीट दिले जात आहे. काँग्रेस मोठा पक्ष आहे. त्यांनी जिंकणाऱ्या उमेदवाराला पाठबळ द्यायला हवे. आम्ही १२ वर्षांपासून फिल्डवर काम करीत आहोत. प्रत्येक तालुक्यात बांधणी झाली आहे. आम्ही ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढू व जिंकून दाखवू, असा दावाही त्यांनी केला.

काँग्रेसचे स्थानिक नेते सोबत

सुधाकर अडबाले म्हणाले, काँग्रेसकडून मला नक्कीच समर्थन मिळेल. विविध संस्था व संघटनांनी आपल्याला पाठिंबा दिला आहे. ७५ वर्षांपासून संघटनेचा इतिहास आहे. काँग्रेस विचारसरणीची ही संघटना आहे. आमचा महाविकास आघाडीवर विश्वास आहे. आजवर सात आमदार एकूण १६ वेळा काँग्रेसच्या पाठबळावरच सभागृहात निवडून गेले आहेत. काँग्रेसचे बरेच नेते व पदाधिकारी माझ्यासाठी मत मागत आहेत. त्यामुळे १६ तारखेपर्यंत काँग्रेसकडून पाठिंबा जाहीर होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :PoliticsराजकारणMahavikas Aghadiमहाविकास आघाडीnagpurनागपूरcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना