शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

नागपूर जिल्ह्यात ग्रा.पं.साठी मतदानाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 15:28 IST

नागपूर जिल्ह्यातील ३७४ ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि सदस्यपदासाठी घेण्यात येत असलेल्या मतदानाला बुधवारी शांततेत सुरुवात झाली. जिल्ह्यात सर्वच तालुक्यात दुपारी २ पर्यंत सरासरी ४५ टक्क्याहून अधिक मतदानाची नोंद झाली होती.

ठळक मुद्दे३७४ ग्रा.पं.मध्ये मतदान७३०३ उमेदवार रिंगणातदुपारी २ पर्यंत ४५ टक्के मतदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यातील ३७४ ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि सदस्यपदासाठी घेण्यात येत असलेल्या मतदानाला बुधवारी शांततेत सुरुवात झाली. जिल्ह्यात सर्वच तालुक्यात दुपारी २ पर्यंत सरासरी ४५ टक्क्याहून अधिक मतदानाची नोंद झाली होती.राज्य निवडणूक आयोगाने नागपूर जिल्ह्यातील ३८१ ग्राम पंचायत आणि रामटेक तालुक्यातील भिलेवाडा येथील सरपंचपदाचा निवडणूक कार्यक्रम २३ आॅगस्ट रोजी जाहीर केला होता. निवडणुकीचे सर्व टप्पे पार पडल्यानंतर जिल्ह्यात ६ ग्रा.पं.मध्ये सरपंच आणि सदस्यपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. यासोबत दोन ग्रा.पं.मध्ये सरपंच पदाचे उमेदवार बिनविरोध नामित करण्यात आले. त्यामुळे बुधवारी ३७४ ग्रा.पं.मध्ये सरपंच आणि सदस्य पदासाठी मतदानाला सकाळी ७.३० वाजता सुरुवात झाली.जिल्ह्यात सरपंच आणि ग्रा.प.च्या सदस्य पदाच्या एकूण २९४० जागांसाठी मतदान घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील ३७४ सरपंचपदासाठी १३०९ उमेदवार रिंगणात आहेत. यासोबतच ३७४ ग्रा.पं.च्या विविध संवर्गातील सदस्य पदासाठी ५९९४ उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी ५ लाख ९९ हजार ६६६ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील.नरखेड तालुक्यात ३० ग्रा.पं.मध्ये दुपारी २ वाजेपर्यंत ३५ टक्के मतदान झाले होते. यानंतर कामठी तालुक्यातील ११ ग्रा.पं.मध्ये दुपारी २ पर्यंत ५३ टक्के मतदान झाले. मौदा तालुक्यात ३१ ग्रा.पं.मध्ये २५ टक्के मतदान झाले. भिवापूर तालुक्यातील २७ ग्रा.पं.मध्ये दुपारी १२ पर्यंत २८.५८ टक्के मतदान झाले. काटोल तालुक्यात दुपारी १२ पर्यंत २६ टक्के मतदान झाले. कळमेश्वर तालुक्यात २१ ग्रा.पं.साठी दुपारी २ पर्यंत ५३ टक्के मतदान झाले होते.रामटेक तालुक्यातील नवरगाव केंद्रावर केंद्र प्रमुखाला उमेदवाराने मारहाण केल्याने येथे काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता.उमरेड तालुक्यात दुपारी २ पर्यंत ३० टक्के मतदान झाले. नरखेड तालुक्यात दुपारी २ पर्यंत ५० टक्याहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.सावनेर तालुक्यातील २७ ग्रा.पं.मध्ये दुपारी १.३० वाजेपर्यंत ४७.३५ टक्के मतदान झाले होते. रामटेक तालुक्यात दुपारी १.३० वाजेपर्यंत ४७.६२ टक्के मतदान झाले होते.

 

टॅग्स :Electionनिवडणूक