शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

नागपूर जिल्हा साक्षर मात्र शाळाबाह्य विद्यार्थ्यांची समस्या कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 00:52 IST

सरकारी रेकॉर्डनुसार नागपूर जिल्हा २० वर्षापूर्वी साक्षर झाला आहे. परंतु राष्ट्रीय साक्षरता अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेला विभाग अजूनही निरंतर सुरू आहे. कालांतराने या विभागाचे नाव बदलून निरंतर शिक्षण विभाग केले आहे. नागपूर जिल्हा साक्षरता यादीत आला असला तरी, शाळाबाह्य विद्यार्थ्यांची समस्या आजही जिल्ह्यात कायम आहे. ही समस्या शिक्षण विभागापुढे मोठे आवाहन आहे.

ठळक मुद्देनिरंतर शिक्षण विभाग करीत आहे परीक्षेसंदर्भातील कार्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकारी रेकॉर्डनुसार नागपूर जिल्हा २० वर्षापूर्वी साक्षर झाला आहे. परंतु राष्ट्रीय साक्षरता अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेला विभाग अजूनही निरंतर सुरू आहे. कालांतराने या विभागाचे नाव बदलून निरंतर शिक्षण विभाग केले आहे. नागपूर जिल्हा साक्षरता यादीत आला असला तरी, शाळाबाह्य विद्यार्थ्यांची समस्या आजही जिल्ह्यात कायम आहे. ही समस्या शिक्षण विभागापुढे मोठे आवाहन आहे.१९९५ पूर्वी झालेल्या देशभरातील सर्वेक्षणात नागपूर जिल्ह्यात १,९३,१७४ नागरिक निरक्षर आढळले. त्यामुळे केंद्र सरकारने २ आॅक्टोबर १९९५ मध्ये राष्ट्रीय साक्षरता अभियान देशपातळीवर राबविले. या अभियानासाठी राज्याच्या शिक्षण विभागाने प्रौढ शिक्षा विभागाची स्थापना केली. यात १८ पदांना मान्यता दिली. या विभागाच्या माध्यमातून १५ ते ४५ वयोगटातील नागरिकांना शिक्षित करण्यासाठी उपक्रम राबविण्यात आले. त्यावेळी सुशिक्षित युवक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, समाजसेवक आदींच्या सहकार्याने जिल्ह्यात संपूर्ण साक्षरता अभियान राबविण्यात आले. यात १६६६४ स्वयंसेवकांनी १ लाख ८१ हजार ८३४ लोकांना साक्षर करण्याचे कार्य केले. याची पुष्टी २४ नोव्हेंबर १९९८ ते २८ नोव्हेंबर १९९८ दरम्यान एका बाह्य मूल्यमापनातून झाली.इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट अहमदाबाद यांनी मूल्यमापन करून जिल्हा ९५ टक्के साक्षर झाल्याचा अहवाल दिला. त्यानंतर राष्ट्रीय साक्षरता अभियानातून नागपूर जिल्हा वगळण्यात आला. परंतु अभियानांतर्गत प्रौढ शिक्षण विभाग सुरूच होता. २००२ मध्ये या विभागाचे नाव बदलवून निरंतर शिक्षण विभाग करण्यात आले. या विभागात शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, कार्यक्रम सहायक असे १८ पदांना मान्यता आहे. या विभागाला आता शिक्षण सहसंचालक कार्यालयाद्वारे शिक्षणासंदर्भात तपासणीचे कार्य दिले जात आहे. मुळात या संस्थेचा उद्देश हा साक्षर बनविण्याचा आहे. नागपूर जिल्ह्यात २०१४ मध्ये झालेल्या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणात जिल्ह्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी शाळाबाह्य आढळले. नागपूर जिल्ह्यात १३२ गावांमध्ये भटक्या लोकांचे वास्तव्य आहे. यांच्यामध्ये शिक्षणाचे प्रमाण फार अत्यल्प आहे. यांच्या मुलांना शाळेत आणण्याचे मोठे आवाहन प्राथमिक शिक्षण विभागापुढे आहे. परंतु एकीकडे साक्षरतेसाठी काम करणारा निरंतर शिक्षण विभाग यापासून अलिप्त आहे. त्यांच्याकडे परीक्षेच्या मूल्यांकनाचे काम सोपविले जात आहे.शाळाबाह्य विद्यार्थ्यांची समस्या कायमशिक्षण विभागाने घेतलेल्या आढाव्यात २०१६-१७ मध्ये ३६४ शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करून घेण्यात आले. २०१७-१८ मध्ये जिल्ह्यात ४९ व शहरात ५७ शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करण्यात आले. २०१८-१९ मध्ये सुद्धा जिल्ह्यात १५१ शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करून घेण्यात आले.शिक्षण विभागात रिक्त पदांची समस्यानागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात रिक्त पदांची समस्या कायम आहे. यात उपशिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुखांची पदे मोठ्या संख्येने रिक्त आहेत. अशात निरंतर शिक्षण विभागात काम नसतानाही हा विभाग अजूनही कार्यरत आहे. याकडे सरकारचे सुद्धा लक्ष नाही. निरंतर शिक्षा विभागात शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, कार्यक्रम सहायकसह १८ पदांना मान्यता आहे.अधिकाऱ्यांची पहिली पसंत निरंतर शिक्षणजिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांकडे असलेल्या कामाच्या ताणामुळे ते त्रस्त आहे. माध्यमिक शिक्षण अधिकारी न्यायालयीन प्रकरणामुळे त्रस्त आहे. या भानगडी नकोच अशी भूमिका अधिकाऱ्यांची असल्याने त्यांची पहिली पसंत निरंतर शिक्षण विभाग आहे. कारण येथे कामच राहिलेले नाही.

टॅग्स :Educationशिक्षणnagpurनागपूर