नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ज्येष्ठांचे ४३ टक्के बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 07:00 IST2021-03-24T07:00:00+5:302021-03-24T07:00:07+5:30

Nagpur news कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक धोकादायक असल्याचे दिसून येत आहे. नागपूर जिल्ह्यात मागील २१ दिवसात २८३ रुग्णांचे बळी गेले.

In Nagpur district, 43 per cent seniors were killed in the second wave of corona | नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ज्येष्ठांचे ४३ टक्के बळी

नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ज्येष्ठांचे ४३ टक्के बळी

ठळक मुद्दे२१ दिवसात जिल्ह्यात २८३ मृत्यूची नोंदमेयोमध्ये ४७ तर मेडिकलमध्ये ७७ ज्येष्ठांचे मृत्यू

सुमेध वाघमारे

नागपूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक धोकादायक असल्याचे दिसून येत आहे. नागपूर जिल्ह्यात मागील २१ दिवसात २८३ रुग्णांचे बळी गेले. यात ४३.८१ टक्के मृत्यू हे ६० वर्षांवरील ज्येष्ठांचे आहेत. मेयोमध्ये ४७ तर मेडिकलमध्ये ७७ असे एकूण १२४ ज्येष्ठ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे ज्येष्ठांची अधिक काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

युरोपमध्ये दुसरी लाट विनाशकारी ठरली आहे. मार्च महिन्यापासून दुसऱ्या लाटेला सुरुवात झाल्याचे सांगण्यात येत असले तरी त्याचा प्रभाव दिसून येऊ लागला आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून दैनंदिन रुग्णसंख्येत हजार, दुसऱ्या आठवड्यापासून दोन हजार तर तिसऱ्या आठवड्यापासून तीन हजाराने रुग्ण वाढून आता रुग्णसंख्या साडेतीन हजारांवर गेली आहे. मृत्यूची संख्या पहिल्या आठवड्यात १०च्या आत होती. दुसऱ्या आठवड्यात ती वाढून १५ पर्यंत गेली. तिसऱ्या आठवड्यात ३५ पर्यंत गेली. २२ मार्च रोजी या वर्षातील सर्वाधिक ४० मृत्यूची नोंद झाली.

-१४७ रुग्णांच्या मृत्यूमागे ‘को-मॉर्बिडिटीज’

मेडिकलमध्ये मृत्यू झालेल्या १५७ पैकी १४७ (९३.६३ टक्के) कोरोनाबाधितांना अनियंत्रित मधुमेह, उच्च रक्तदाब, मूत्रपिंड, यकृताचा आजार, कर्करोग आदी ‘को-मॉर्बिडिटीज’असल्याचे समोर आले आहे. हे गंभीर आजार माहीत नसलेल्या मृत्यूची संख्या १० होती.

-लक्षणे दिसताच चाचणी करा, उपचार घ्या

कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्यास किंवा लक्षणे दिसताच चाचणी करा. पॉझिटिव्ह आल्यास डॉक्टरांनी सांगितल्यानुसार उपचार घ्या. लक्षणे असल्यास ६० वर्षांवरील वय असल्यास किंवा ‘को-मॉर्बिडिटीज’ असल्यास रुग्णालयात भरती व्हा. उपचारात डॉक्टरांना मदत करा. स्वत:हून औषधी घेणे टाळा.

-डॉ. प्रशांत पाटील

प्रमुख, औषधवैद्यकशास्त्र विभाग

 

:

Web Title: In Nagpur district, 43 per cent seniors were killed in the second wave of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.