नागपूर जिल्ह्यात पेंच प्रकल्पाचे १४ दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 10:56 AM2019-09-14T10:56:42+5:302019-09-14T10:57:57+5:30

पारशिवनी तालुक्यातील नवेगाव खैरी येथील पेंच प्रकल्पाचे १४ दरवाजे शुक्रवारी सकाळी उघडण्यात आले. मध्य प्रदेशच्या चौराई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने या धरणातील पाणीसाठा वाढला आहे.

In Nagpur district, 14 gates of the Pench project were opened | नागपूर जिल्ह्यात पेंच प्रकल्पाचे १४ दरवाजे उघडले

नागपूर जिल्ह्यात पेंच प्रकल्पाचे १४ दरवाजे उघडले

googlenewsNext
ठळक मुद्देपाणीसाठ्यात वाढ पर्यटकांची गर्दी वाढली

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: पारशिवनी तालुक्यातील नवेगाव खैरी येथील पेंच प्रकल्पाचे १४ दरवाजे शुक्रवारी सकाळी उघडण्यात आले. मध्य प्रदेशच्या चौराई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने या धरणातील पाणीसाठा वाढला आहे.
येथील पाणी तोतलाडोह धरणात सोडण्यात आले. यानंतर जिल्ह्यातील नदीकाठावर असणाऱ्या गावांना पेंचचे दरवाजे उघडण्यात येईल याबाबत जिल्हाधिकारी व तहसीलदार याच्या मार्फत सूचना देण्यात आल्या होत्या.
तोतलाडोह धरणाची पाण्याची क्षमता पूर्ण झाल्यानंतर नवेगाव खैरी येथील पेंच धरणात पाणी सोडणे सुरू करण्यात आले.
बुधवारपासून पेंच धरणाच्या उपलब्ध पाणीसाठ्यावर सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष होते. शुक्रवारी पहाटे धरणाची पाण्याची पूर्ण संचय पातळी ३२५सेंटिमीटर झाली. त्यामुळे पेंच धरणाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला टप्याटप्याने एकूण १६ दरवाज्यापैकी १४ दरवाजे उघडण्यात आले.
प्रत्येक दरवाजा ३० सेंटिमीटर उंच उघडण्यात आला होता. यावेळी पेंचचे सौंदर्य आणखीच खुलून दिसत होते. त्यामुळे सकाळपासून येथे पर्यटकांची व परिसरातील लोकांची गर्दी झाली होती.

Web Title: In Nagpur district, 14 gates of the Pench project were opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण