नागपुरात तीन दिवसात डिझेल ९५ पैसे, पेट्रोल ८७ पैशांनी महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 23:46 IST2021-02-11T23:42:31+5:302021-02-11T23:46:11+5:30

diesel and petrol hike पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत दरदिवशी वाढ होत आहे. त्यामुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूंसह इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, जगणे कठीण झाले आहे. दरवाढीची शासनाला चिंता नसल्याचे दिसून येत आहे. यातच तीन दिवसात डिझेल प्रतिलीटर ९५ पैसे आणि पेट्रोल ८७ पैशांनी महाग होऊन अनुक्रमे ९४.८५ व ८५.४८ रुपयांवर पोहोचले आहे.

In Nagpur, diesel became expensive by 95 paise and petrol by 87 paise in three days | नागपुरात तीन दिवसात डिझेल ९५ पैसे, पेट्रोल ८७ पैशांनी महाग

नागपुरात तीन दिवसात डिझेल ९५ पैसे, पेट्रोल ८७ पैशांनी महाग

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत दरदिवशी वाढ होत आहे. त्यामुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूंसह इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, जगणे कठीण झाले आहे. दरवाढीची शासनाला चिंता नसल्याचे दिसून येत आहे. यातच तीन दिवसात डिझेल प्रतिलीटर ९५ पैसे आणि पेट्रोल ८७ पैशांनी महाग होऊन अनुक्रमे ९४.८५ व ८५.४८ रुपयांवर पोहोचले आहे.

या क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणाले, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत ६१ डॉलर प्रतिबॅरल या कमी स्तरावर आहे. त्यानुसार नागपुरात पेट्रोलचा दर ३१.५० रुपये प्रतिलीटर होतो. पण केंद्र आणि राज्य शासनाचे विविध कर आणि सेसमुळे पेट्रोलचे दर ९५ रुपयांवर गेले आहेत. हीच स्थिती डिझेलची आहे. २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत १०५ डॉलर प्रतिबॅरल असतानाही पेट्रोल आणि डिझेलचे भाव सध्याच्या तुलनेत कमी होते. नागपुरात शासनाकडून आयआरडीपीसी सेसच्या माध्यमातून एमएसआरडीसीला संबंधित संपूर्ण रक्कम २०१९ मध्येच मिळाली आहे. त्यानंतरही आयआरडीपीसी नागपुरातून यावर सेस वसूल करीत आहे. हा सेस पेट्रोलवर एक टक्के आणि डिझेलवर तीन टक्के दराने घेण्यात येत आहे. त्यातच नागपुरात पेट्रोल आणि डिझेल दरदिवशी महाग होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य आणि वाहतूकदारांचे जगणे कठीण झाले आहे.

पेट्रोल, डिझेलचे प्रतिलीटर रुपये दर

तारीख    पेट्रोल    डिझेल

७ फेब्रु. ९३.९८  ८४.५३

८ फेब्रु. ९३.९८  ८४.५३

९ फेब्रु. ९४.३२  ८४.९०

१० फेब्रु. ९४.६१  ८५.१६

११ फेब्रु. ९४.८५  ८५.४८

Web Title: In Nagpur, diesel became expensive by 95 paise and petrol by 87 paise in three days