शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

नागपूरमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला, दोघांनी चाकूने भोसकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 14:28 IST

चार दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी दोघांनी एका तरुणाला चाकूने भोसकून ठार मारण्याचा प्रयत्न केला. रविवारी पहाटे दीड ते पावणेदोनच्या सुमारास पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

 नागपूर - चार दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी दोघांनी एका तरुणाला चाकूने भोसकून ठार मारण्याचा प्रयत्न केला. रविवारी पहाटे दीड ते पावणेदोनच्या सुमारास पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. तुषार मौलीकर (वय १९) आणि जगदीश गोखले (वय १९) अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेही लाडपुरा, नंदागिरी मार्गावर राहतात. 

  दिगांबर उर्फ विक्की पराते (वय २२, रा. तांडापेठ) तसेच ललित उर्फ मल्लू तुळशीराम निमजे (वय १९) या दोघांसोबत आरोपी मौलीकर आणि गोखले चार दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्यामुळे चौघांनी एकमेकांना मारहाणही केली होती. त्यावेळी विक्कीने आरोपींच्या कानशिलात लगावल्या होत्या. त्याचा वचपा काढण्यासाठी आरोपी चार दिवसांपासून संधी शोधत होते. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर विक्की आरोपींच्या घराजवळून जात होता. त्याला एका गल्लीत गाठून आरोपी गोखलेने त्याला मागून पकडले आणि मौलीकरने विक्कीच्या  छातीवर, पोटावर, मांडीवर चाकूचे सपासप घाव मारून त्याला गंभीर जखमी केले. आरडाओरड ऐकून शेजारी धावले. त्यामुळे आरोपी पळून गेले. गंभीर अवस्थेतील विक्कीला मेयोत दाखल करण्यात आले. ही माहिती कळताच पाचपावलीचा पोलीस ताफा घटनास्थळी धावला. शनिवारी या प्रकरणी निमजेच्या तक्रारीवरून एएसआय अशोक पुंड यांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपी गोखलेला अटक करण्यात आली. मौलीकरचा शोध घेतला जात आहे. 

परिसरात तणाव

अवघे १९ वर्षे वय असलेल्या आरोपींनी क्षुल्लक हाणामारीच्या घटनेवरून विक्कीच्या हत्येचा कट रचून त्याच्यावर प्राणघातक हल्ला चढविण्याच्या या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. जखमी विक्कीची प्रकृती गंभीर असून, फरार असलेल्या आरोपी मौलीकरचा पोलिसांसोबत काही तरुणही शोध घेत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस