नागपुरात सायबरटेकची किमया ! घरटॅक्स ८०० झाले १८०००

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 11:49 PM2017-12-06T23:49:39+5:302017-12-06T23:51:06+5:30

शहरातील मालमत्तांचा सर्वे करताना मे.सायबरटेक सिस्टम्स अ‍ॅन्ड सॉफ्टवेअर लिमिटेड कंपनीची मनमानी सुरू आहे. वर्षाला ८०० रुपये टॅक्स येणाऱ्याला १८००० डिमांड पाठविले आहे.

In Nagpur cybertech wonder ! HouseTax 800 went up to 18000 Rs. | नागपुरात सायबरटेकची किमया ! घरटॅक्स ८०० झाले १८०००

नागपुरात सायबरटेकची किमया ! घरटॅक्स ८०० झाले १८०००

Next
ठळक मुद्देमनपाच्या घरांच्या सर्वेवर प्रश्नचिन्ह: नागरिक संतप्त

आॅनलाईन लोकमत
नागपूर : शहरातील मालमत्तांचा सर्वे करताना मे.सायबरटेक सिस्टम्स अ‍ॅन्ड सॉफ्टवेअर लिमिटेड कंपनीची मनमानी सुरू आहे. वर्षाला ८०० रुपये टॅक्स येणाऱ्याला १८००० डिमांड पाठविले आहे. दरवर्षी १७६६ रुपये टॅक्स भरणाऱ्याला ३२,७१७ रुपयांचा तर ८८६ रुपयांचा टॅक्स तब्बल १४,८८७ रुपये लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे नोटिफाईड स्लम भागातील घरांवर आकारण्यात आलेल्या टॅक्सची ही आकडेवारी आहे. वाढीव टॅक्सच्या डिमांड वाटपाचे काम सुरू आहे. परंतु आवाक्याबाहेरील घरटॅक्सच्या डिमांड लोकांना मिळताच याचा भडका उडण्याची शक्यता आहे.
प्रभाग क्रमांक २१ मधील नोटिफाईड स्लम असलेल्या लालगंज गुजरी येथील रहिवाशांना सुधारित घरटॅक्स डिमांड पाठविण्यात आलेल्या आहेत. गजानन पौनीकर यांचा घर क्रमांक ३९० आहे. त्यांना वर्षाला ८१७ रुपये टॅक्स येत होता. कोणत्याही प्रकारची थकबाकी नसताना त्यांना १८,१९७ रुपयांचे डिमांड पाठविण्यात आले आहे. याच वस्तीतील अनिल माकोडे यांच्या घर क्रमांक ५८० वर दरवर्षी १७६६ रुपये टॅक्स आकारला जात होता. त्यांना ३२,७१७ रुपयांचे डिमांड पाठविण्यात आले आहे. तर रामभाऊ तख्तेवाले यांच्या ३८७ क्रमांकाच्या घरावर ८८६ रुपये टॅक्स आकारला जात होता. त्यांना १४,८८७ रुपयांचे तर ९०० रुपये टॅक्स भरणाºया मोहन हिरालाल शेंडे याना ७७९९ रुपयांचे डिमांड पाठविले आहे. अन्य लोकांनाही अशाच वाढीव रकमेच्या डिमांड पाठविण्यात आल्या आहे.
या वस्तीतील बहुसंख्य नागरिक मोलमजुरी वा लहानसहान व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. अशा परिस्थितीत १० ते २० पट वाढीव टॅक्स कसा भरणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील ज्या-ज्या भागात टॅक्सच्या नवीन डिमांडचे वाटप सुरू आहे. अशा भागातील नागरिकांचीही अशीच ओरड आहे.
प्रभागाच्या नगरसेविका आभा पांडे यांनी जुन्या व नवीन टॅक्स आकारणीची आकडेवारीसह माहिती दिली. डिमांड वाटपाची प्रक्रिया सुरू असल्याने अद्याप मोजक्याच नागरिकांना डिमांड मिळाल्या आहेत. आवाक्याबाहेरील डिमांडमुळे नागरिकांत असंतोष वाढत आहे. सर्वांना डिमांड मिळताच असंतोषाचा भडका उडणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Web Title: In Nagpur cybertech wonder ! HouseTax 800 went up to 18000 Rs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.