शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

नागपुरात सायबर ठगबाजांनी पोलीस शिपायालच गंडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 8:59 PM

क्रेडिट कार्ड अ‍ॅक्टिव्हेट करण्याच्या बहाण्याने शहर पोलीस ठाण्यातील शिपायालाच सायबर ठगबाजांनी ५० हजार रुपयांनी गंडविले. ही घटना गिट्टीखदान पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : क्रेडिट कार्ड अ‍ॅक्टिव्हेट करण्याच्या बहाण्याने शहर पोलीस ठाण्यातील शिपायालाच सायबर ठगबाजांनी ५० हजार रुपयांनी गंडविले. ही घटना गिट्टीखदान पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडली.सुरेंद्र हरीणखेडे हे शहर पोलीस विभागात वाहनचालक असून पोलीस लाईन क्वॉर्टर येथे राहतात. ७ एप्रिलला ही घटना घडली. सुरेंद्र यांनी अ‍ॅक्सिस बँकेचे नवे क्रेडिट कार्ड घेतले होते. त्यांना ७ एप्रिलला ९१६९०१५२६८३६ या मोबाईल क्रमांकाकरून एक कॉल आला. पलिकडून बोलणाऱ्याने आपण अ‍ॅक्सिस बँकेतून बोलत असल्याचे सांगून संभाषणाला सुरुवात केली. सुरेंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईलवर चर्चा केल्यानंतर ते अंघोळीला गेले. या दरम्यान आरोपीने पुन्हा दुसऱ्यांदा कॉॅल केला. यावेळी सुरेंद्र यांच्या पत्नीने कॉल रिसिव्ह केला. आरोपीने सुरेंद्रच्या मोबाईलवर ओटीपी क्रमांक पाठविला होता. तो त्यांच्या पत्नीने सांगून दिला. या आधारावर सुरेंद्र यांच्या क्रेडिट कार्डवरून ५० हजार ४०० रुपये उडविले. या प्रकरणी सुरेंद्र यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून पोलिसांनी धोकेबाजी आणि आयटी अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिस