शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
3
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
4
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
5
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
6
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
7
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
8
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
9
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
10
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
11
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
12
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
13
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
14
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
15
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
16
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
17
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
18
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
19
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
20
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

Nagpur Police : १७ पोलीस कर्मचाऱ्यांवर कोसळली निलंबनाची कुऱ्हाड; 'हे' आहे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2022 17:17 IST

नागपूर पोलीस दलातील तब्बल १७ कर्मचाऱ्यांना एकाच वेळेस १७ निलंबित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देपोलीस आयुक्तांची कारवाई

नागपूरनागपूर पोलीस दलातील दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तब्बल १७ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. अशाप्रकारे १७ कर्मचारी एकाचवेळी निलंबित होण्याची ही पहिलीच वेळ आहे

आरोग्य आणि अन्य रजा घेऊन सतत कर्तव्यावर गैरहजर राहणाऱ्या पोलिसांची यादी तयार करण्यात आली होती. यामध्ये अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या कर्मचाऱ्यांना दोन दिवसांपूर्वी कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यातील काही कर्मचारी कामावर परतले तर काही कर्चमारी गैरहजर राहीले. याबाबतचे ठळक कारणही ते देऊ शकले नाही. परिणामी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गैरहजर राहणाऱ्या १७ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. 

राज्यातील पोलीस दलासंदर्भात नेहमीच बातम्या येत असतात. पोलिसांच्या बदलीसंदर्भात उचललेले सकारात्मक पाऊल असो वा सुव्यवस्थेबाबतच्या नकारात्मक बातम्या असो नागपूर पोलीस दल कायम चर्चेत असते. तर, आता १७ पोलिसांना एकाचवेळी निलंबित केल्यामुळे नागपूर पोलीस पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

टॅग्स :Policeपोलिसnagpurनागपूरsuspensionनिलंबन