नागपुरात व्यापाऱ्याला मारहाण करून लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 23:03 IST2018-06-15T23:03:16+5:302018-06-15T23:03:26+5:30

नागपुरात व्यापाऱ्याला मारहाण करून लुटले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मित्राला मारहाण होताना बघून वाचवायला गेलेल्या एका व्यापाºयाला चार आरोपींनी विटेने मारून त्याच्या जवळचे दागिने तसेच सात हजार रुपये लुटून नेले. गुरुवारी रात्री १०.३० वाजता ही घटना घडली. चेतन केशव कुंभरे (वय ३०) असे जखमी व्यापाऱ्याचे नाव असून ते नवी मंगळवारी, कोलबास्वामी नगरात राहतात.
कुंभरे यांचा कुर्ता पायजामा बनविण्याचा कारखाना आहे. गुरुवारी रात्री त्यांनी आपला कारखाना बंद केला आणि ते शटरसमोर उभे झाले असता त्यांना त्यांचा मित्र पंकज श्रवण निमजे याला जगदीश गोखले फायटरने मारहाण करताना दिसला. मित्राला वाचविण्यासाठी ते तिकडे धावले. तेवढ्यात आरोपी गोखलेचे तीन साथीदार हातात चाकू घेऊन आले. गोखले तसेच त्याच्या साथीदारांनी कुंभरेंना मारहाण केली. बाजूची विट उचलून त्यांच्या डोक्यावर हाणली आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी, अंगठी तसेच सात हजार रुपये हिसकावून आरोपी पळून गेले. जखमी कुंभरे यांनी पाचपावली ठाण्यात या घटनेची तक्रार नोंदवली. पोलिसांनी मारहाण करून जबरी चोरी गेल्याप्रकरणी आरोपी गोखले तसेच त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.