शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

नागपुरात ‘भाजयुमो’ने काढला महाविकास आघाडी सरकारचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 9:37 PM

भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगरद्वारे महाआघाडी सरकारचा कुंभकर्ण रुपी बडग्याचे दहन करण्यात आले. सहाही विधानसभा क्षेत्रात बडग्या मारबत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देवीज बिल, कोरोनाच्या संक्रमणावरून केले टार्गेटसहाही विधानसभा क्षेत्रात केले दहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगरद्वारे महाआघाडी सरकारचा कुंभकर्ण रुपी बडग्याचे दहन करण्यात आले. सहाही विधानसभा क्षेत्रात बडग्या मारबत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले.कोरोनाच्या काळात लोक आर्थिक संकटातून जात असताना विजेच्या वाढीव बिलामुळे अधिकचा मार बसलेला आहे. पण हे सरकार पाझर न फुटणाऱ्या दगडाप्रमाणे ठप्प बसले आहे. म्हणून भाजपा युवा मोर्चाने कुंभकर्णाच्या निद्रावस्थेत असलेला सरकाररुपी बडग्या बनवला, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.दक्षिण-पश्चिम नागपुरात प्रतापनगर चौक, दक्षिण नागपुरात छोटा ताजबाग चौक, पूर्व नागपुरातील छापरू नगर चौक, मध्य नागपुरातील बडकस चौक, पश्चिम नागपुरातील शंकरनगर चौक व उत्तर नागपुरातील कमाल चौक येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनांना आमदार कृष्णा खोपडे, माजी आमदार डॉ.मिलींद माने, किशोर पलांदुरकर, सुबोध आचार्य, श्रीकांत देशपांडे, संजय बंगाले, सुनील हिरणवार, अमर बागडे, शिवानी दाणी, प्रसाद मुजुमदार, कमलेश पांडे, प्रणय पाटणे, यश सातपुते,सारंग कदम, सचिन करारे, दीपांशु लिंगायत, आलोक पांडे यांच्यासह विविध कार्यकर्ते उपस्थित होते.बंदी असताना कसे निघाले बडगे?‘भाजयुमो’तर्फे बडगे काढत असताना ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालन करण्यात आले नाही. शिवाय अनेक कार्यकर्ते बिना ‘मास्क’चे होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मिरवणुकीची परवानगी पोलीस आणि प्रशासनाने नाकारली होती. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यासंदर्भात आदेशदेखील दिले होते. सोबतच शहरात बडग्यांच्या मिरवणुका निघू नये म्हणून चौकाचौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पण ‘भाजयुमो’चे कार्यकर्ते नियम तोडून बडग्यांची मिरवणूक काढत असताना त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. विशेष म्हणजे काही ठिकाणी तर पोलिसांच्या डोळ्यादेखत बडगे काढण्यात आले.

 

टॅग्स :agitationआंदोलन