नागपूर-औरंगाबाद शिवशाही स्लीपर बसला अपघात; एक ठार सहा गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 13:35 IST2019-08-10T13:23:06+5:302019-08-10T13:35:17+5:30
नागपूर-औरंगाबाद शिवशाही स्लीपर बस क्र. १३९४ ला शनिवारी (दि. १०) पहाटे चिखलीजवळ अपघात होऊन एकजण ठार तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत.

नागपूर-औरंगाबाद शिवशाही स्लीपर बसला अपघात; एक ठार सहा गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: नागपूर-औरंगाबाद शिवशाही स्लीपर बस क्र. १३९४ ला शनिवारी (दि. १०) पहाटे चिखलीजवळ अपघात होऊन एकजण ठार तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. ही औरंगाबाद आगाराची बस होती व ती रात्री ९ वाजता नागपूरच्या गणेशपेठ बसस्थानकातून निघाली होती. ही बस उलटल्याने अपघात झाल्याचे समजते. नागपुरातील प्रख्यात चित्रकार रमेश सालोडकर हे या बसमधून प्रवास करीत होते. त्यांचे या अपघातात निधन झाले आहे. सविस्तर बातमी लवकरच देत आहोत.