शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

मागील तीन वर्षांत नागपूरने दोन केंद्रीय संस्थाही गमावल्या; एनआयएमएच अहमदाबादला, तर सीबीडब्ल्यूई दिल्लीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 06:24 IST

एनआयएमएच अहमदाबादला, तर सीबीडब्ल्यूई दिल्लीला गेले

- आशिष रॉय नागपूर :  २२ हजार कोटी रुपयांचा टाटा एअरबस प्रकल्प वडोदराला गेल्यानंतर नागपूरकर प्रचंड संतापले आहेत. परंतु केवळ उद्योगच नव्हे तर नागपूर शहराने मागील तीन वर्षात केंद्राच्या दोन महत्त्वाच्या संस्थासुद्धा गमावल्या आहेत, हे विशेष! राष्ट्रीय खनिक आरोग्य संस्थान (एनआयएमएच) ला गुजरातच्या अहमदाबादला हलवण्यात आले. तर केंद्रीय कामगार शिक्षण मंडळ (श्रमिक शिक्षा बोर्ड)ला नागपूरवरून दिल्लीत स्थापित करण्यात आले. कुठल्याही पक्षाने या संस्था बाहेर जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला नाही.

एनआयएमएचला बंद होण्यापासून वाचवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या अंजली साळवे - विटणकर यांनी सांगितले की, जुलै २०१९मध्ये एनआयएमएचला बंद करून ते राष्ट्रीय व्यावसायिक आरोग्य संस्थेत (एनआयओएच) अहमदाबाद येथे विलीन करण्यात आले. त्यावेळी स्थानिक नेत्यांची भेट घेतली. परंतु कुणीही मदत केली नाही. येथे केंद्र सरकारच्या मोठ्या प्रमाणावर खाणी आहेत. त्यामुळे एनआयएमएचला नागपुरातच ठेवायला हवे होते. केंद्रीय कामगार शिक्षण मंडळ जेव्हा दिल्लीला शिफ्ट केले जात होते तेव्हाही स्थानिक नेते उदासीन होते.    

 एनआयपीईआर कुठे आहे? 

तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राष्ट्रीय औषधीय शिक्षण व अनुसंधान संस्था (एनआयपीईआर) ची शाखा नागपुरात उघडण्याची घोषणा फेब्रुवारी २०१५मध्ये केली होती. राज्य सरकारने कालडोंगरी येथे ४० एकर जागाही निश्चित केली होती. परंतु सात वर्षे लोटूनही केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या एक्सपेंडिचेर फायनान्स कमिटीने याला हिरवी झेंडी दाखवलेली नाही.   

एमआरओ गेला हैदराबादला 

फ्रान्सची कंपनी सेफरनने मिहानमध्ये मेंटेनन्स, रिपेअर आणि ओवर हॉल डिपो डेपो (एमआरओ) लावण्याची इच्छा दर्शविली होती. परंतु महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने वेळेत जमीन उपलब्ध करून दिली नाही. या प्रकल्पात १,१८५ कोटी  रुपयांची गुंतवणूक होणार होती. महाविकास आघाडीचे सरकार असताना सेफरनने २०२२मध्ये एमआरओ हैदराबादला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे