शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

Nagpur: ‘हिट ॲंड रन’ प्रकरणात २२ दिवसांनी आरोपी ताब्यात, मात्र नोटीस देऊन सुटका, पोलिसांच्या भूमिकेविरोधात संताप

By योगेश पांडे | Updated: May 30, 2024 21:50 IST

Nagpur News: मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलांना उडविण्याच्या प्रकरणात पोलिसांनी २२ दिवसांनी आरोपीला शोधून ताब्यात घेतले. मात्र त्याच्यावर दाखल कलमे लक्षात घेता केवळ नोटीस देऊन त्याची सुटका करण्यात आली आहे. त्याच्या एका चुकीमुळे महिलेला मरणयातना भोगाव्या लागत असून बसणेदेखील कठीण झाले आहे.

- योगेश पांडे नागपूर - मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलांना उडविण्याच्या प्रकरणात पोलिसांनी २२ दिवसांनी आरोपीला शोधून ताब्यात घेतले. मात्र त्याच्यावर दाखल कलमे लक्षात घेता केवळ नोटीस देऊन त्याची सुटका करण्यात आली आहे. त्याच्या एका चुकीमुळे महिलेला मरणयातना भोगाव्या लागत असून बसणेदेखील कठीण झाले आहे. मात्र कायद्याचा आधार घेत आरोपी मात्र मोकाट बाहेर पडला आहे. या प्रकरणात पोलिसांची सुरुवातीपासूनची भूमिका संशयास्पद होती व आता या प्रकारामुळे तर आणखी संताप व्यक्त करण्यात येत आहे.

७ मे २०२४ ला सकाळी ७ च्या दरम्यान गिट्टीखदानमधील ममता संजय आदमने (वय ४५) आणि वंदना अजय पाटील या दोघींना शिवाजी चौकात एका पांढऱ्या रंगाच्या कारने चिरडले होते. सीसीटीव्हीमध्ये हा अपघात कैद झाला होता. या अपघातानंतर आदमने यांची प्रकृती खालावली असून त्यांना पलंगावरून उठणेदेखील शक्य नाही. त्यांच्या कुटुंबावर यामुळे मोठा आर्थिक ताण पडला आहे. गिट्टीखदान पोलीस ठाण्यात जखमींच्या बयाणाच्या आधारावर भादंविच्या कलम २७९, ३३७ तसेच मोटर वाहन कायद्याच्या कलम १३४, १७७ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीमध्ये आरोपीच्या कारचा नंबर स्पष्ट दिसत नसल्याचे सांगत हात झटकणे सुरू केले. अखेर सोशल माध्यमांवर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ सक्रिय झाले व आरोपी कारचालकाला शोधण्यासाठी पावले उचलण्यात आली. तपासानंतर पोलिसांनी कमलेश नावाच्या कॅबचालकाला ताब्यात घेतले. आश्चर्याची बाब म्हणजे त्याच्या चुकीमुळे एक महिला मरणयातना भोगत असताना त्याला केवळ नोटीस देऊन सोडून देण्यात आले. तर त्याची कार जप्त करण्यात आली. अपघात प्रकरणातील कलमांनुसार त्याला सोडण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र गुन्हा दाखल करतानाच कठोर कलमं का लावण्यात आली नाहीत, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

सोशल माध्यमांमुळे आली पोलिसांना जाग?या प्रकरणात पोलीस अगोदर हात झटकत होते व सीसीटीव्हीत कारचा क्रमांक दिसत नसल्याचा दावा करत होते. मात्र हे प्रकरण सोशल माध्यमांमध्ये येताच पोलिसांना जाग आली व दोन दिवसांत आरोपीचा शोध लावून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे पोलिसांची सुरुवातीची भूमिका प्रामाणिक होती की आता दबाव निर्माण झाल्यामुळे पावले उचलण्यात आली असा सवाल उपस्थित होत आहे.

टॅग्स :AccidentअपघातnagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी