Nagpur: पाठलाग करून गांजा विकणाऱ्याला केले गजाआड

By दयानंद पाईकराव | Updated: March 23, 2024 21:13 IST2024-03-23T21:11:30+5:302024-03-23T21:13:53+5:30

Nagpur News: गांजा विकत असलेल्या आरोपीचा पाठलाग करून गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने त्याच्या ताब्यातून ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विवेक पंजाबराव जताळे (२४, रा. काळे ले आऊट, आर्यनगर, कोराडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

Nagpur: A ganja seller was chased and arrested | Nagpur: पाठलाग करून गांजा विकणाऱ्याला केले गजाआड

Nagpur: पाठलाग करून गांजा विकणाऱ्याला केले गजाआड

- दयानंद पाईकराव 
नागपूर - गांजा विकत असलेल्या आरोपीचा पाठलाग करून गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने त्याच्या ताब्यातून ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विवेक पंजाबराव जताळे (२४, रा. काळे ले आऊट, आर्यनगर, कोराडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या युनिट ५ चे पथक शुक्रवारी दुपारी ३.१० वाजताच्या सुमारास गस्त घालत होते. पोलिसांना कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आर्यनगर वॉर्ड नं. १ येथे नाल्याजवळ असलेल्या चिंचेच्या झाडाखाली सार्वजनिक ठिकाणी एक व्यक्ती हातात पिशवी घेऊन संशयास्पदरित्या आढळला. पोलिसांना पाहून तो पळून जात होता. पोलिसांनी पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले. त्याच्या जवळील पिशवीची तपासणी केली असता त्यात १२ हजार ५०० रुपये किमतीचा ८२५ ग्रॅम गांजा आढळला. आरोपीविरुद्ध कलम ८ (क), २० (ब), २९ एनडीपीएस अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यास कोराडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Web Title: Nagpur: A ganja seller was chased and arrested