शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

नागपुर @ ५.७ डिग्री : थंडीची लाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 21:43 IST

नागपुरात थंडीची लाट पसरली आहे. केवळ २४ तासात किमान तापमान ५.२ डिग्रीने खाली आले असून ते ५.७ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे. सामान्यपेक्षा ७ डिग्री पारा खाली उतरल्यामुळे शहर अति थंडीच्या लाटेत सापडले आहे. यासोबतच नागपूर पूर्ण विदर्भात सर्वात थंड राहिले. शुक्रवारी या मोसमातील सर्वात थंड दिवसाची नोंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसर्वत्र भरली हुडहुडी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरात थंडीची लाट पसरली आहे. केवळ २४ तासात किमान तापमान ५.२ डिग्रीने खाली आले असून ते ५.७ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे. सामान्यपेक्षा ७ डिग्री पारा खाली उतरल्यामुळे शहर अति थंडीच्या लाटेत सापडले आहे. यासोबतच नागपूर पूर्ण विदर्भात सर्वात थंड राहिले. शुक्रवारी या मोसमातील सर्वात थंड दिवसाची नोंद करण्यात आली आहे.विशेष म्हणजे सात दिवसांपूर्वीच नागपूरचे किमान तापमान ६.३ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. यानंतर हळूहळू पारा वाढत जाऊन गुरुवारी तो १०.९ डिग्रीपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे थंडीपासून थोडा दिलासा मिळाला होता. परंतु उत्तर भारतातून येणाऱ्या थंड हवेच्या वाऱ्यामुळे वातावरण अचानक बदलले. चार वर्षांपूर्वी २९ डिसेंबर २०१४ रोजी शहरातील किमान तापमान ५ डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आले होते. ते आजवरचे सर्वात कमी तापमान राहिले आहे. अशावेळी शुक्रवारी नोंदवण्यात आलेले तापमान आतापर्यंतच्या सर्वाधिक थंड दिवसापेक्षा केवळ ०.७ डिग्री सेल्सिअस अधिक होते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या ४८ तासात थंड हवेचा जोर राहणार असल्याने शहरात थंडीची लाट कायम राहील. त्याचप्रकारे विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही थंड हवेचा जोर कायम राहील.नागपूरनंतर ८.५ डिग्री सेल्सिअससह अकोला, बुलडाणा, गोंदिया संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर राहिले. वाशिम ९ डिग्री, यवतमाळ, ब्रह्मपुरी, चंद्रपूरमध्ये १० डिग्री, वर्धा १०.५ डिग्री, अमरावतीमध्ये १०.६ डिग्री आणि गडचिरोलीमध्ये ११.२ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.२८ डिसेंबरचा असाही योगायोग२८ डिसेंबर १९८३ रोजी नागपुरातील किमान तापमान ५.७ डिग्री सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले होते. योगायोगाने शुक्रवारी २८ डिसेंबर २०१८ रोजी किमान तापमान ५.७ डिग्री सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. आगामी काही दिवसात अशीच कडाक्याची थंडी राहण्याचा अंदाज आहे.सर्वात कमी तापमान---------------------------दिनांक                तापमान----------------------------२९ डिसेंबर २०१४     ५.०२९ डिसेंबर १९६८    ५.५२८ डिसेंबर १९८३    ५.७२२ डिसेंबर २०१८    ६.३२८ डिसेंबर २०१८    ५.७------------------------------

टॅग्स :weatherहवामानnagpurनागपूर