नागपुरात बिबट्याने केली ५ चितळ, ३ काळविटांसह एका चौसिंग्याची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 14:10 IST2019-02-06T13:01:06+5:302019-02-06T14:10:03+5:30
गोरेवाडा भागात असलेल्या प्राणी संवर्धन केंद्रात एका बिबट्याने ५ चितळ, ३ काळवीट व एक चौसिंग्याला ठार केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

नागपुरात बिबट्याने केली ५ चितळ, ३ काळविटांसह एका चौसिंग्याची शिकार
ठळक मुद्देआत कसा शिरला याबाबत कर्मचारी अनभिज्ञ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: येथील गोरेवाडा भागात असलेल्या प्राणी संवर्धन केंद्रात एका बिबट्याने ५ चितळ, ३ काळवीट व एक चौसिंग्याला ठार केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. हा बिबट काटोल मार्गावर असलेल्या गोरेवाडा जंगलातून आला असल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे गोरेवाडा केंद्राला इलेक्ट्रॉनिक्स तारेचे कुंपण असूनही बिबट्याने ते ओलांडून प्रवेश केला व प्राण्यांवर हल्ला चढवला. बुधवारी सकाळी वनकर्मचाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आली.