नागपूर @ ४७.२ : नवतपा संपल्यानंतही तापमान कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 22:20 IST2019-06-05T22:19:36+5:302019-06-05T22:20:38+5:30
नवतपा संपल्यानंतरही नागपुरात तापमान कमी झाले नाही. गेल्या चार दिवसात शहरात दुसऱ्यांदा पारा ४७ डिग्रीवर गेला आहे. शरीराला झोंबणारे ऊन, अशात ढगाळलेल्या वातावरणामुळे उम्मस आणखी वाढली आहे. बुधवारी नागपूरचे तापमान ४७.२ डिग्री सेल्सियस नोंदविण्यात आले. तर ब्रह्मपुरीत तापमानाची नोंद ४७.५ डिग्री करण्यात आली असून, विदर्भात सर्वात उष्ण शहर ठरले.

नागपूर @ ४७.२ : नवतपा संपल्यानंतही तापमान कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवतपा संपल्यानंतरही नागपुरात तापमान कमी झाले नाही. गेल्या चार दिवसात शहरात दुसऱ्यांदा पारा ४७ डिग्रीवर गेला आहे. शरीराला झोंबणारे ऊन, अशात ढगाळलेल्या वातावरणामुळे उम्मस आणखी वाढली आहे. बुधवारी नागपूरचेतापमान ४७.२ डिग्री सेल्सियस नोंदविण्यात आले. तर ब्रह्मपुरीत तापमानाची नोंद ४७.५ डिग्री करण्यात आली असून, विदर्भात सर्वात उष्ण शहर ठरले.
गेल्या काही दिवसांपासून नागपूरच्या वातावरणात बदल होत आहे. सकाळच्या सुमारास काही काळ आकाशात ढग दाटून येतात. मात्र दिवस जसजसा वाढतो तसतशी सूर्याची किरणे आणखी प्रखर होतात. परत दुपारी ४ वाजताच्या सुमारास वातावरण ढगाळ होते. या वातावरणामुळे गरमीचा आणखी त्रास नागरिकांना होत आहे. काही भागात तुरळक पाऊसही पडला आहे. शहरातील हे वातावरण येणाºया १० जूनपर्यंत कायम राहणार असल् याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पारा सुद्धा ४६ ते ४७ डिग्रीच्या जवळपास राहण्याचा अंदाज आहे. बुधवारी असेच वातावरण अनुभवायला मिळाले. दुपारी उष्ण वारेही चांगलेच वाहत होते.
शहर हाय हीटच्या विळख्यात
बुधवारी कमाल तापमान ६ डिग्रीने जास्त होते. तर पारा सामान्यत: ४ डिग्री जास्त होता. हे वातावरण अतिउष्ण म्हणून (हाय हीट) गणले जाते. साधारणत: मे महिन्यात असे वातावरण असते. परंतु यावर्षी जूनमध्ये सुद्धा हे वातावरण कायम आहे.
तिसऱ्यांदा पाऱ्याने केले ४७ क्रॉस
यावर्षी पारा तिसऱ्यांदा ४७ डिग्रीवर गेला आहे. २८ मे रोजी पारा ४७.५ डिग्री सेल्सियस नोंदविण्यात आला होता. वर्षी २८ मे सर्वात उष्ण दिवस ठरले. त्यानंतर २ जूनला पारा ४७ डिग्री नोंदविण्यात आला. तर ५ जूनला पारा ४७.२ डिग्री सेल्सियसवर जाऊन पोहचला.