नागपूर @ ४.६ ; तापमान सरासरीपेक्षा १.९ अंशाने घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 10:39 IST2019-01-30T10:36:32+5:302019-01-30T10:39:50+5:30

गेल्या दहा दिवसांपासून उत्तरेकडून येणाऱ्या बोचऱ्या गार वाऱ्याचा व त्याने वाढत जाणाऱ्या थंडीचा कडाका सहन करणाऱ्या नागपूरकरांना अजून एका थंडगार रात्रीचा सामना करावा लागला.

Nagpur@ 4.6 | नागपूर @ ४.६ ; तापमान सरासरीपेक्षा १.९ अंशाने घसरले

नागपूर @ ४.६ ; तापमान सरासरीपेक्षा १.९ अंशाने घसरले

ठळक मुद्देपारा १.९ अंशाने घसरला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: गेल्या दहा दिवसांपासून उत्तरेकडून येणाऱ्या बोचऱ्या गार वाऱ्याचा व त्याने वाढत जाणाऱ्या थंडीचा कडाका सहन करणाऱ्या नागपूरकरांना अजून एका थंडगार रात्रीचा सामना करावा लागला. बुधवारी सकाळी सूर्याने दर्शन दिले असले तरी हवेतला गारठा व थंडगार वारे सुरू होते. या वाऱ्यांचा जोर वाढल्याने मंगळवारी रात्री नागपूरचे किमान तापमान ४.६ एवढे नोंदविण्यात आले. हे तापमान सरासरीपेक्षा १.९ अंशाने घसरले आहे. हवामानखात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार ३० जानेवारी रोजी नागपुरातील किमान तापमान ५ अंश एवढे राहण्याची शक्यता आहे. तसेच चालू आठवड्यात ते क्रमश: अधिक वाढत जाण्याची शक्यताही सांगण्यात आली आहे.

Web Title: Nagpur@ 4.6