नागपूर @ ४५.६0
By Admin | Updated: May 31, 2014 01:07 IST2014-05-31T01:07:03+5:302014-05-31T01:07:03+5:30
नवतपा सुरू होऊन ५ दिवस उलटल्यानंतर खर्या अर्थाने त्याचा प्रभाव जाणवायला लागला आहे. शुक्रवारी नागपुरात यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. दुपारच्या सुमारास पारा ४५.६

नागपूर @ ४५.६0
नागपूर : नवतपा सुरू होऊन ५ दिवस उलटल्यानंतर खर्या अर्थाने त्याचा प्रभाव जाणवायला लागला आहे. शुक्रवारी नागपुरात यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. दुपारच्या सुमारास पारा ४५.६ अंश सेल्सिअसपर्यंंंंंत पोहोचला होता. वाढत्या तापमानामुळे अगोदरच हैराण असलेल्या उपराजधानीतील नागरिकांसाठी पुढील काही दिवस परीक्षेचे ठरू शकतात, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
नवतपा सुरू झाल्यानंतरदेखील तापमान चढले नव्हते. परंतु गेल्या दोन दिवसांपासून पारा वाढतो आहे. शुक्रवारी कमाल तापमान सरासरीपेक्षा ३ अंशांनी अधिक होते. दिवसभरात नागरिकांना ‘कभी धूप, कभी छांव’चा अनुभव आला. दुपारनंतर उपराजधानीच्या आकाशात ढगांची गर्दी दाटून आल्यामुळे उन्हाची दाहकता कमी झाली. परंतु उष्ण वारे वाहतच होते. शिवाय आद्र्रता वाढल्यामुळे आणखी उकाडा वाढला. सायंकाळी मात्र वादळी वार्यांमुळे वातावरणच बदलले व नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला. दरम्यान, येत्या काही दिवसात पारा ४६ अंशापर्यंंंंंत जाण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागातर्फे देण्यात आली आहे.(प्रतिनिधी)