Nagpur: रिसर्च सेंटरमध्ये गुंतवणुकीच्या नावाने २० लाखांनी गंडविले
By दयानंद पाईकराव | Updated: August 19, 2023 20:51 IST2023-08-19T20:46:54+5:302023-08-19T20:51:50+5:30
Nagpur: रिसर्च सेंटरमध्ये गुंतवणुक केल्यास नफा मिळवून देण्याची बतावणी करून व्यापाऱ्याला २० लाखांनी गंडविणाऱ्या आरोपीविरुद्ध सक्करदरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Nagpur: रिसर्च सेंटरमध्ये गुंतवणुकीच्या नावाने २० लाखांनी गंडविले
- दयानंद पाईकराव
नागपूर - रिसर्च सेंटरमध्ये गुंतवणुक केल्यास नफा मिळवून देण्याची बतावणी करून व्यापाऱ्याला २० लाखांनी गंडविणाऱ्या आरोपीविरुद्ध सक्करदरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ओमकार महेंद्र तलमले (वय २५, रा. शाहु ले आऊट दत्तवाडी) असे आरोपीचे नाव आहे. रितेश मारोती बेलखोडे (वय ३८, रा. मिनिमातानगर कळमना) यांचे नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत आर. एम. एन्टरप्रायजेस नावाचे हार्डवेअरचे दुकान आहे. बेलखोडे यांचा बिझनेर ग्रुप आहे. त्यात आरोपी ओमकार सदस्य होता. त्यामुळे बेलखोडे यांच्याशी आरोपीचे बोलणे होत होते. २६ डिसेंबर २०२२ ते २६ जून २०२३ दरम्यान आरोपी ओमकारने केंद्र शासनाच्या रिसर्च सेंटरमध्ये ओळख असून तेथे गुंतवणूक केल्यास सहा महिन्यात अधिक नफा मिळवून देण्याची बतावणी केली. आरोपीने बेलखोडे यांच्याकडून २० लाख रुपये उकळले. त्यानंतर त्यांना रक्कम परत न करता कोणताही नफा मिळवून न देता त्यांची फसवणूक केली. बेलखोडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सक्करदरा पोलिसांनी आरोपी ओमकारविरुद्ध कलम ४०६, ४२० नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.