शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

CoronaVirus in Nagpur : नागपुरात १३ रुग्ण पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 23:48 IST

अमरावती व मध्य प्रदेशातून ‘सारी’वरील उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल झालेल्या व नंतर कोविड पॉझिटिव्ह आलेल्या या दोन्ही रुग्णांचा गुरुवारी मृत्यू झाला. नागपुरात मृतांची संख्या १३ झाली आहे. आज आणखी १३ नव्या रुग्णांची भर पडली. या रुग्णांसह कोरोनाबाधितांची संख्या ६२६ वर पोहचली आहे.

ठळक मुद्देरुग्णसंख्या ६२६ : मृतांची संख्या १३ : दोन्ही मृत्यू सारी-कोविड रुग्णाचे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अमरावती व मध्य प्रदेशातून ‘सारी’वरील उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल झालेल्या व नंतर कोविड पॉझिटिव्ह आलेल्या या दोन्ही रुग्णांचा गुरुवारी मृत्यू झाला. नागपुरात मृतांची संख्या १३ झाली आहे. आज आणखी १३ नव्या रुग्णांची भर पडली. या रुग्णांसह कोरोनाबाधितांची संख्या ६२६ वर पोहचली आहे.नागपुरात लॉकडाऊनचे निर्बंध मागे घेण्याच्या प्रक्रियेचा पहिला टप्पा सुरू झाला असतानाच कोरोना प्रादुर्भावाचा जोर मात्र कायम आहे. मेयोच्या प्रयोगाशाळेत १० रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात भानखेडा येथील २७, ३६, ६० वर्षीय पुरुष तर ७१, ७५ वर्षीय महिला, टिमकी येथील ४५ व ६३ वर्षीय महिला, २७ व ४० वर्षीय पुरुष तर मोमिनपुरा येथील एक रुग्ण आहे. मेडिकलच्या प्रयोगशाळेत दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले. हे दोन्ही रुग्ण अकोला येथील आहेत. एम्सच्या प्रयोगशाळेतही एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे. लोकमान्यनगर येथील या ४३ वर्षीय पुरुष रुग्णाला एम्समध्येच भरती करण्यात आले. एम्सच्या कोविड वॉर्डात आता २७ रुग्ण उपचार घेत आहेत.सारी-कोविडचे पाच मृत्यूरुक्मिणीनगर अमरावती येथील ६५ वर्षीय परुष रुग्णाला ३ जून रोजी नागपूरच्या मेडिकलमध्ये भरती करण्यात आले होते. हा रुग्ण ‘सिव्हिअरली अ‍ॅक्यूट रेस्पिरेटरी इलनेस’चा (सारी) होता. नियमानुसार सारीच्या रुग्णाची कोविड चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचार ़सुरू असताना आज सकाळी ६ वाजता त्यांचा मृत्यू झाला. या शिवाय, मध्य प्रदेशातील सागर येथील ६२ वर्षीय महिला २ जून रोजी मेडिकलमध्ये दाखल झाली होती. ‘सारी’ची रुग्ण असलेली ही महिलाही कोविड पॉझिटिव्ह आली. उपचार सुरू असताना दुपारी २.३० वाजता तिचा मृत्यू झाला. एकाच दिवशी सारीच्या दोन रुग्णांच्या मृत्यूची ही पहिलीच वेळ आहे. या पूर्वी सारी-कोविड पॉझिटिव्हचे तीन मृत्यू झाले असून हा चौथा व पाचवा मृत्यू आहे. नागपुरातील रुग्णालयात नोंद झालेल्या सारीच्या ५००वर रुग्णांमधून आतापर्यंत १३ रुग्ण कोविड पॉझिटिव्ह आले आहेत.मेयोतून १२ रुग्णांना डिस्चार्जमेयोतून १२ रुग्णांना डिस्चार्ज म्हणजे सुटी देण्यात आली. यात अजनी, बांगलादेश, सावनेर, हंसापुरी, नाईक तलाव, सिरसपेठ येथील प्रत्येकी एक तर मोमिनपुरा, टिपू सुलतान चौक व कामठी येथील प्रत्येकी दोन रुग्ण आहेत. या रुग्णांसह आतापर्यंत ४१७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित २४०दैनिक तपासणी नमुने १५४दैनिक निगेटिव्ह नमुने १४३नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ६२६नागपुरातील मृत्यू १३डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ४१७डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण २,९३१क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित १,६१३पीडित-६२६-दुरुस्त-४१७-मृत्यू-१३

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू