शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप
2
आजचे राशीभविष्य, १८ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश मिळेल, वरिष्ठ खूश होतील! मान व प्रतिष्ठा वाढेल
3
"ओबीसींना आडवे येणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा, विजय वडेट्टीवार भूमिका स्पष्ट करा"; भुजबळ यांचे ओबीसी एल्गार सभेत आवाहन
4
२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक
5
‘सरसकट सीबीआय चौकशीचे आदेश देऊ नका’; सर्वोच्च न्यायालयाचा अन्य न्यायालयांना आदेश 
6
अभिमानास्पद! लढाऊ ‘स्वदेशी तेजस’ची गगनभेदी भरारी; संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते देशार्पण
7
गुजरातमध्ये नव्या मंत्रिमंडळात आता २६ मंत्री; १९ नवे चेहरे; नव्या मंत्र्यांचा शपथविधी; आठ मंत्री पटेल समाजाचे
8
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
9
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
10
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
11
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
12
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
13
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
14
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
15
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
16
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
17
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
18
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
19
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
20
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 

Nagpur: होळीच्या वस्तूंची उलाढाल १० कोटींची, रंग, गुलाल, पिचकारी, गाठीची विक्री

By मोरेश्वर येरम | Updated: March 23, 2024 20:48 IST

Nagpur News: होळी सणानिमित्त नागपुरातील सर्वच बाजारपेठांमध्ये उत्साह संचारला आहे. रेशिम ओळ, लोहा ओळ आणि इतवारी बाजारात रंग, गुलाल, पिचकारी आणि मुखवटे खरेदीसाठी मोठ्यांसह लहानांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे.

- मोरेश्वर मानापुरे नागपूर - होळी सणानिमित्त नागपुरातील सर्वच बाजारपेठांमध्ये उत्साह संचारला आहे. रेशिम ओळ, लोहा ओळ आणि इतवारी बाजारात रंग, गुलाल, पिचकारी आणि मुखवटे खरेदीसाठी मोठ्यांसह लहानांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. विदर्भाची मुख्य बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या नागपुरात यंदा सर्वच वस्तूंची जवळपास १० कोटींची उलाढाल होण्याची शक्यता आहे.

इतवारीतील व्यापारी अतुल लांजेवार म्हणाले, यंदा मनसोक्त होळी खेळण्याचे लोकांचे नियोजन दिसून येत आहे. फ्लॅट स्कीम, कॉलनी आणि मोहल्यांमध्ये आतापासून होळीचा उत्साह आहे. होळीला रंग, गुलाल आणि गाठ्यांना मागणी आहे. गुलाल उत्पादकांनी सर्व रंगाच्या गुलालाचे उत्पादन जानेवारीपासून सुरू केले आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यातच मॉल, शहर, तालुके आणि राज्याच्या अन्य भागात विक्रीसाठी पाठविला. यंदा विदर्भात सर्वाधिक नागपुरी गुलालाची विक्री होणार आहे. याशिवाय रेशिम ओळीत रंगाची जास्त दुकाने आहेत.

रंगाच्या किमती दीडपटयंदा रंगाच्या किमती दीडपट झाल्या आहेत. चांगल्या दर्जाच्या रोडामॅन (५०० टक्के) लाल रंगाची किंमत ५० रुपये तोळा (१० ग्रॅम) आहे. त्यापाठोपाठ हिरवा रंग विकला जातो. बाजारपेठेत होळीला रंगाची एक ते दीड कोटींची उलाढाल होते. पारंपारिक गुलाल १०० ते ११०, तर हर्बल गुलाल २०० ते २५० रुपये किलो आहे. रंग आणि गुलालाची बाजारपेठ ५ कोटींची आहे.

गाठी ९० ते ११० रुपये किलोहोळीला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मित्रमंडळी आणि नातेवाईकांना साखरेपासून तयार केलेल्या गाठी देण्याची प्रथा आहे. होळीनिमित्त नागपुरातील जवळपास २५ ते ३० उत्पादक एक महिन्याआधीच गाठीचे उत्पादन करतात. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा गाठीचे भाव १०० ते १२० रुपयांपर्यंत उतरले आहेत. दोन ते तीन किलो वजनातील आकर्षक डिझाईनची गाठी १३० ते १४० रुपये किलोदरम्यान आहे. नागपुरातील उत्पादकांकडून संपूर्ण विदर्भात गाठी विक्रीसाठी जातात. या व्यवसायात जवळपास दोन कोटींची उलाढाल होते. किराणा दुकानदारांपासून हातठेल्यावर गाठीची विक्री होत असल्याचे दिसून येत आहे.

पिचकारी व मुखवट्यांची विक्रीइतवारीत पिचकारी, मुखवटे आणि अन्य वस्तूंचे ठोक विक्रेते आहेत. सर्व व्यापारी चीनमधून मुंबईत उतरणारा माल विक्रीसाठी नागपुरात मागवितात. हा माल संपूर्ण विदर्भात विक्रीसाठी जातो. यंदा ५० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत पिचकारी, २० ते २०० रुपयांपर्यंत मुखवटे विक्रीला आहेत. या वस्तूंची बाजारपेठ जवळपास २ कोटींची आहे.

होळीमुळे छोट्या विक्रेत्यांना सुगीचे दिवसहोळी सणामुळे छोट्या विक्रेत्यांना रंग, गुलाल, गाठी विक्रीतून चांगला नफा मिळतो. यंदा विक्रेत्यांमध्ये निश्चितच उत्साह दिसून येत आहे. अनेकजण हातठेल्यावर मालाची विक्री करीत असल्याचे चित्र शहराच्या विविध चौकात दिसत आहे. या सणामुळे कुटुंबाचे आर्थिक नियोजन होत असल्याचे मत महाल चौकातील विक्रेत्यांनी व्यक्त केले.

गुलाब फुलांना असते मागणीउपराजधानीत फुलांच्या होळीची क्रेझ वाढत आहे. होळीत रसायनापासून तयार झालेल्या रंगाने त्वचेला नुकसान होत असल्यामुळे नैसर्गिक फुलांनी अर्थात गुलाबाच्या पाकळ्यांनी होळी खेळण्याकडे लोकांचा कल वाढला असून गुलाब फुलांना मागणी वाढली आहे. ठोक बाजारात भाव ८० ते १०० रुपयादरम्यान आहे.

टॅग्स :Holiहोळी 2024nagpurनागपूर