शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

नाभिक समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करा ; विधिमंडळावर धडकला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 7:41 PM

नाभिक समाजाचा अनुसूचित जाती प्रवर्गात समावेश करण्यात यावा या मागणीला घेऊन  महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्यावतीने सोमवारी विधिमंडळावर मोर्चा धडकला.

ठळक मुद्देमोर्चात आणले कंगवा, वस्तरा व कैचीचे कटआऊट

आॅनलाईन लोकमतनागपूर : नाभिक समाजाचा अनुसूचित जाती प्रवर्गात समावेश करण्यात यावा या मागणीला घेऊन  महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्यावतीने सोमवारी विधिमंडळावर मोर्चा धडकला. मोर्चाच्या शिष्टमंडळाने सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांना मागण्यांचे निवदेन दिले. यावेळी बडोले यांनी अधिवेशन संपल्यानंतर याविषयी बैठक बोलविण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे समजते.नाभिक समाज सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात अतिशय मागासलेला असून त्यांच्या विकासासाठी त्यांचा अनुसूचित जाती प्रवर्गात समावेश करणे गरजेचे असल्याचे महामंडळाचे महासचिव प्रभाकरराव फुलबांधे यांनी सांगितले. मोर्चात संपूर्ण  महाराष्ट्रातून  नाभिक समाजबांधव सहभागी झाले होते. काही जण हाती भगवा झेंडा तर काहींनी वस्तरा, कैची व कंगव्याचे कटआऊट आणले होते.या मोर्चाचे नेतृत्व भगवानराव बिडवे, प्रभाकरराव फुलबांधे, दत्ताजी अनारसे, अंबादास पाटील आदींनी केले. नाभिक समाजाचा अनुसूचित जाती प्रवर्गात समावेश करावा, नाभिक व्यावसायिकांना गटई कामगाराप्रमाणे लोखंडी टपरी योजना लागू करावी, नाभिक समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, गाळे आरक्षित करून मिळावे, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे, विधान परिषद, राज्यसभा आदी ठिकाणी प्रतिनिधित्व मिळावे, अशा मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात आल्या.

टॅग्स :Nagpur Winter Sessionनागपूर हिवाळी अधिवेशनVidhan Bhavanविधान भवन