शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

'बाबरीच्या वेळेस बाळासाहेब नाही तर मग तुमचे काका गेले होते का?' उद्धव ठाकरेंची खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 21:09 IST

'त्याचे हिंदुत्व गोमुत्रधारी हिंदुत्व आहे. गोमुत्र शिंपडता, त्यापेक्षा थोडे प्राशन करा, अक्कल येईल.'

नागपूर: आज भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरात महाविकास आघाडाची वज्रमूठ सभा पार पडली. यावेळी तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. शिवसेना(उबाठा) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी एकनाथ शिंदेंसह भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी अयोध्येचा मुद्दाही उपस्थित केला. 

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, 'मी पहिल्यांदा अयोध्येला गेलो होतो, तेव्हा प्रकरण कोर्टात प्रलंबित होते. पहिले मंदिर मग सरकार असं आम्ही बोललो होतो. तेव्हा पंतप्रधान मोदींना आधीच बोललो होतो की, तुमचे सरकार आहे, आपण राम मंदिर बनवूया. ते सुप्रीम कोर्टात काय व्हायचं ते होऊ द्या म्हणाले. मग आता श्रेय का घेताय? मुख्यमंत्री आता अयोध्येला गेले. ते खरे रामभक्त असते तर आधी सूरत आणि गुवाहाटीला नाही तर अयोध्येला गेले असते. 

"घरात बसून कारभार करूनही पहिल्या पाचमध्ये महाराष्ट्र होता. जनतेला काय हवं?"

आताचे उपमुख्यमंत्री यापूर्वी कधीच अयोध्येला गेले नाही. पण, मुख्यमंत्री गेले म्हणून हे त्यांच्यासोबत गेले. तुझा शर्ट माझ्यापेक्षा जास्त भगवा कसा? यासाठीच हे अयोध्येला गेले. चंद्रकांत पाटील बोलले की, बाबरीच्या वेळेला बाळासाहेब नव्हते, मग तुमचे काका गेले होते का? बाबरी पाडल्यानंतर भाजपच्या गोटात पळापळ झाली होती. शिवसेना प्रमुखांनी त्यावेळी फोनवर सांगितलं होतं की, जर बाबरी माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे, असंही ते म्हणाले 

'आम्ही छातीवर वार करु, तुमच्यासारखा पाठीवर नाही'; नागपुरातून उद्धव ठाकरे कडाडले

मी माझ्या वडिलांचे नाव घेऊन येतो, तुम्ही तुमच्या वडिलांचे नाव  घेऊन मैदानात या. आम्ही काँग्रेसबरोबर का गेलो? आम्हाल कोणी घालावलं? मी काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदूत्व सोडलं बोलतात. मला संघाला विचारायचं आहे की, नेमकं तुमचं चाललंय काय? आमचं शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही. यांचं हिंदुत्व गोमुत्रधारी हिंदुत्व आहे. गोमुत्र शिंपडता त्यापेक्षा थोडं प्राशन करा, अक्कल येईल. ते शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्व नाकारत आहेत. मोहन भागवत मशिदीत जाऊन आले. एकाबाजूला हनुमान चालीसा म्हणायची आणि मशिदीत दाऊन कव्वाली ऐकणार. हे यांचं हिंदुत्व आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेnagpurनागपूरMahavikas Aghadiमहाविकास आघाडीEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा