ट्रिपल तलाक विधेयकाच्या विरोधात नागपुरात मुस्लीम स्त्रियांचा विराट मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 16:18 IST2018-03-20T16:18:15+5:302018-03-20T16:18:25+5:30

ट्रिपल तलाक विधेयक हे शरियतच्या विरोधात असून यापुढे अशी आगळिक केली जाऊ नये, असा पवित्रा घेतलेल्या हजारो मुस्लीम स्त्रियांनी आज मंगळवारी दुपारी नागपुरात शांतता रॅली काढून आपला निषेध नोंदवला.

The Muslim Women's rally against the Triple Talaq Bill in Nagpur | ट्रिपल तलाक विधेयकाच्या विरोधात नागपुरात मुस्लीम स्त्रियांचा विराट मोर्चा

ट्रिपल तलाक विधेयकाच्या विरोधात नागपुरात मुस्लीम स्त्रियांचा विराट मोर्चा

ठळक मुद्देट्रिपल तलाक विधेयक विनाआधार असल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: ट्रिपल तलाक विधेयक हे शरियतच्या विरोधात असून यापुढे अशी आगळिक केली जाऊ नये, असा पवित्रा घेतलेल्या हजारो मुस्लीम स्त्रियांनी आज मंगळवारी दुपारी नागपुरात शांतता रॅली काढून आपला निषेध नोंदवला. आॅल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाद्वारे आयोजित हा मोर्चा श्रीमोहनी कॉम्प्लेक्स येथून निघून, संविधान चौकात पोहचला. बोर्डाच्या सदस्य प्रो. मोनीसा बुशरा आबिदी यांनी मोर्चाला उद्देशून केलेल्या भाषणात, ट्रिपल तलाक विधेयक हे स्त्रियांवर झालेला अत्याचार आहे. मुस्लीम समाजाला संपविण्यासाठी रचलेला कट असून ते विधेयक असंवैधानिक असल्याचे म्हटले.
प्रो. मोनीसा बुशरा आबिदी यांच्या नेतृत्वातील एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्या सुपूर्द केल्या.
या मोर्चात हजारोच्या संख्येने मुस्लीम स्त्रिया बुरखा घालून सहभागी झाल्या होत्या. अशा प्रकारचा हा नागपुरातील पहिला मोर्चा असल्याचे सांगितले जाते.

Web Title: The Muslim Women's rally against the Triple Talaq Bill in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.