संगीतकार राम-लक्ष्मण जोडीतील लक्ष्मण उपाख्य विजय पाटील यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 10:27 PM2021-05-22T22:27:22+5:302021-05-22T22:29:27+5:30

Musician Ram-Laxman duo Laxman passed away प्रसिद्ध संगीतकार जोडी ‘राम-लक्ष्मण’ जोडीतील लक्ष्मण उपाख्य विजय पाटील यांचे नागपूर येथे मुलाकडे निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी शोभा पाटील, मुलगा संगीतकार अमर पाटील, सुना, नातवंडे, दोन मुली असा परिवार आहे.

Musician Ram-Laxman duo Laxman Upakhya Vijay Patil passed away | संगीतकार राम-लक्ष्मण जोडीतील लक्ष्मण उपाख्य विजय पाटील यांचे निधन

संगीतकार राम-लक्ष्मण जोडीतील लक्ष्मण उपाख्य विजय पाटील यांचे निधन

googlenewsNext
ठळक मुद्देअनेक चित्रपटांना दिले यादगार संगीत

लाेकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : प्रसिद्ध संगीतकार जोडी ‘राम-लक्ष्मण’ जोडीतील लक्ष्मण उपाख्य विजय पाटील यांचे नागपूर येथे मुलाकडे निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी शोभा पाटील, मुलगा संगीतकार अमर पाटील, सुना, नातवंडे, दोन मुली असा परिवार आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीत राम उपाख्य सुरेंद्र हेंद्रे व लक्ष्मण उपाख्य विजय पाटील या जोडीने चित्रपटातील संगीताची दुनिया पालटली. राजश्री फिल्म्सच्या ‘एजंट विनोद’ हा या जोडीचा पहिला चित्रपट होता. मराठीत दादा कोंडके यांच्या चित्रपटांचे संगीतकार म्हणून ते खूप गाजले. पांडू हवालदार’, ‘तुमचं आमचं जमलं’, ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’, ‘राम राम गंगाराम’, ‘आली अंगावर’ अशा एकाहून एक धमाल चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. आजपर्यंत त्यांनी ७५ हून अधिक हिंदी, मराठी, भोजपुरी चित्रपटांना संगीत दिले. हिंदीत ‘हम से बढकर कौन’, ‘सुन सजना’, ‘दिवाना तेरे नाम का’, ‘पोलीस पब्लिक’, ‘हंड्रेज डेज’, ‘दिल की बाजी’, ‘पत्थर के फुल’ आदी चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. १९८९ मध्ये आलेल्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटाने त्यांना अमाप यश व नाव मिळवून दिले. यासाठी त्यांना फिल्मफेअर पारितोषिकही मिळाले. त्यानंतरचे ‘हम आपके है कौन’ व ‘हम साथ साथ है’ हे चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजले.

नागपुरातून केली कारकिर्दीला सुरुवात

विजय पाटील यांची कारकीर्द नागपुरातून सुरू झाली. कादर ऑर्केस्ट्रात ते गीत, संगीत व गायन करत. एम.ए. कादर हे त्यांचे बालमित्र. बाबा स्वामी, एम.ए. कादर व विजय पाटील ऑर्केस्ट्रात गात. काही वर्षांनी विजय पाटील मुंबईला गेले आणि आपल्या संगीतशैलीने बॉलिवूडसह क्षेत्रीय चित्रपटसृष्टीला आकर्षित केले. त्यांच्या जाण्याने एक सच्चा मित्र गमावला, अशी शोकसंवेदना कादर यांनी व्यक्त केली. एकदा झालेली मैत्री ते शेवटपर्यंत जपत. त्यांनीच मला ‘अंतिम न्याय’ व ‘फौज’ या चित्रपटात पार्श्वगायनाची संधी दिली. कादर संगीत अकादमीचे उद्घाटन आम्ही त्यांच्याच हस्ते केले होते, अशी आठवण कादर यांनी सांगितली.

राम यांच्या जाण्यानंतरही जोडी कायम

राम-लक्ष्मण जोडीने कारकिर्दीतला पहिला चित्रपट ‘एजेंट विनोद’ केल्यानंतर राम उपाख्य सुरेंद्र हेंद्रे यांचे १९७६ मध्ये अकाली निधन झाले. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतरही विजय पाटील यांनी ‘राम-लक्ष्मण’ याच नावाने संगीत दिले. त्यांनी आपल्या जोडीत खंड पडू दिला नाही. यावरून त्यांच्यातील मैत्रभाव व्यक्त होतो.

राम-लक्ष्मण यांची गाजलेली गाणी

राम-लक्ष्मण यांची सर्वच गाणी प्रचंड गाजली आहेत. त्यांनी दिलेल्या संगीताच्या जादूने गीतकाराच्या रचना अशा काही खुलल्या की ती गाणी अजरामर झाली. रोमॅण्टिक असो, भक्तिगीत असो वा मस्तीखोर गाणी आजही त्या गाण्यांचा गोडवा अवीट असाच आहे. आजही वेगवेगळ्या उत्सवांत, कौटुंबिक सोहळ्यात त्यांची संगीतबद्ध गाणी आवडीने वाजविली जातात.

टॉप टेन गाणी

* ढगाला लागली कळं पाणी थेंब थेंब गळं (बोट लावीन तिथे गुदगुल्या)

* मुझसे जुदा होकर, तुम्हे दूर जाना है (हम साथ साथ है)

* अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान (तुमचं आमचं जमलं)

* देवा हो देवा गणपती देवा तुमसे बढकर कौन (हम से बढ कर कौन)

* गब्बर सिंग कह के गया, जो डर गया वो मर गया (१०० डेज)

* एक मच्छर साला आदमी को हिजडा बना देता है (यशवंत)

* मेरे रंग में रंगने वाली, परी हो या हो परीयो की रानी (मैंने प्यार किया)

* ये तो सच है के भगवान है (हम साथ साथ है)

* दीदी तेरा देवर दिवाना (हम आपके है कौन)

* मैया यशोदा ये तेरा कन्हैया (हम साथ साथ है)

दादा कोंडके ते चित्रपटसृष्टीवरचे राज्य

विजय पाटील यांचा जन्म नागपुरात १६ सप्टेंबर १९४२ रोजी झाला. वडील आणि काका यांच्याकडून त्यांना शास्त्रीय संगीताचा वारसा लाभला. सोबतच संगीताचे शास्त्रोक्त धडेही त्यांनी गीरवले. नागपुरात ऑर्केस्ट्रामध्ये काम करत असताना त्यांची भेट प्रसिद्ध अभिनेता दादा कोंडके यांच्याशी झाली. संगीत रचनेवरील पाटील यांचा हात बघून दादा जाम खूश झाले आणि त्यांनी त्यांना आपल्या ‘पांडू हवालदार’ या चित्रपटासाठी संगीतकार म्हणून संधी दिली. तेव्हापासून ते दादा कोंडके यांच्या निवर्तण्यापर्यंत राम-लक्ष्मण आणि दादा कोंडके ही जोडी कायम राहिली. इकडे मराठीत त्यांच्या संगीताची चलती बघून त्यांना हिंदीतील सूरज बडजात्या यांच्या राजश्रीने संधी दिली. राजश्री प्राॅडक्शनच्या प्रत्येक चित्रपटात राम-लक्ष्मण अखेरपर्यंत राहिले आणि लोकप्रिय गाणी त्यांनी दिली. यासोबतच भोजपुरी चित्रपटांतदेखील त्यांनी संगीत दिले आहे.

लता मंगेशकर यांनी वाहिली श्रद्धांजली

गानकोकिळा लता मंगेशकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून विजय पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. राम-लक्ष्मण (विजय पाटील) हे गुणी व लोकप्रिय संगीतकार आणि उत्तम माणूस होते. त्यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी मी गायली आहेत. त्यांच्या अशा जाण्याने धक्का बसल्याची भावना लता मंगेशकर यांनी व्यक्त केली.रामलक्ष्मण गुणवंत संगीतकार

रामलक्ष्मण गुणवंत संगीतकार नागपूरचे सुपुत्र व प्रख्यात संगीतकार तसेच बॉलिवूडमधील चित्रपट संगीत दिग्दर्शक राम लक्ष्मण जोडीतील लक्ष्मण उपाख्य विजय पाटील यांच्या निधनामुळे रामलक्ष्मण या गुणवंत संगीतकाराला आपण मुकलो आहे. नागपूरच्या खासदार सांस्कृतिक महोत्सवात त्यांनी सुंदर कार्यक्रम सादर केला होता. सिनेक्षेत्रातील नावाजलेला फिल्मफेअर पुरस्कार आणि लता मंगेशकर पुरस्काराने त्यांना गौरवान्वित करण्यात आले होते. त्यांच्या निधनामुळे संगीत-क्षेत्राचे नुकसान झाले आहे.

नितीन गडकरी, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री

Web Title: Musician Ram-Laxman duo Laxman Upakhya Vijay Patil passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.