शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

नागपुरातील वाठोड्यात तरुणाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 12:36 AM

जलाराम नगर वाठोडा परिसरात मंगळवारी रात्री ९ च्या सुमारस एका तरुणाची चौघांनी निर्घृण हत्या केली. यामुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला होता.

ठळक मुद्देक्षुल्लक कारणावरून वाद : चाकुने वार, दगडानेही ठेचले : आरोपी फरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जलाराम नगर वाठोडा परिसरात मंगळवारी रात्री ९ च्या सुमारस एका तरुणाची चौघांनी निर्घृण हत्या केली. यामुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला होता. मृतकाचे नाव राहूल शंकर खुबाळकर (वय २४) असून तो जलारामनगरात राहत होता.राहुलचा भाऊ अमित आणि त्याचा मित्र विशाल गजभिये सोमवारी रात्री दुचाकीने जात होते. त्यांच्या दुचाकीची शूभम नामक टाटा एस वाहनासोबत धडक झाली. यावेळी विशालने जखमी अमित तसेच टाटा एसच्या वाहनचालकाला तेथून जाण्यास सांगून आपण सर्व बघून घेऊ असे म्हटले. त्यानंतर विशाला आज शूभमकडे आला. त्याने जखमी अतिमच्या उपचार आणि दुचाकीच्या दुरूस्तीसाठी ४५ हजारांचा खर्च आल्याचे सांगून ती रक्कम मागितली. शूभमने रक्कम देण्यास नकार दिला आणि त्याने अमितचा भाऊ राहूलची भेट घेतली. आरोपी विशाल आपल्याकडे आला होता, त्याने अमितच्या उपचारासाठी ४५ हजार रुपये खर्च झाल्याचे सांगून तो ती रक्कम मागत असल्याचे म्हटले. अमितच्या उपचारासाठी ११५० रुपये खर्च आल्यामुळे ही रक्कम ऐकून राहुलला धक्का बसला. विशाल दुस-याकडून पैसे हडपण्याचे प्रयत्न करीत असल्याचे लक्षात आल्याने त्याने विशालला बोलवून झापले. तू शूभमला पैसे मागायचे नाही, असेही सुनावले. त्यामुळे आरोपी विशाल चिडला. त्याने नितीन ठाकूर तसेच चायनिज टपरीवाल्या दोघांसोबत संगणमत करून राहुलच्या हत्येचा कट रचला. ठरल्याप्रमाणे मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास आरोपींनी राहुलवर चाकूचा हल्ला चढवला. त्यानंतर त्याला दगडाने ठेचून आरोपी फरार झाले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. माहिती कळताच नंदनवनचा पोलीस ताफा घटनास्थळी पोहचला. वृत्त लिहिस्तोवर पोलिसांना आरोपी सापडले नव्हते. त्यांचा शोध घेतला जात होता.पत्नीच्या हत्येचा प्रयत्नजरीपटक्यातील गुरूनानक फार्म सी कॉलेजजवळ, राहणारा आरोपी घनशाम हरीराम गुहीरे, (वय ५०) याने त्याची पत्नीलक्ष्मी गुहीरे (वय ४५) हिला अनैतिक संबंधाच्या संशयावर ठार मारण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी पहाटे ४.४५ च्या सुमारास आरोपीने पत्नीच्या डोक्यावर लोखंडीतव्याने फटके मारून तिला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. मनदिप घनशाम गुहिरे (वय १९) याने दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी गुन्हा नोंदवुन आरोपीस अटक केली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून