भाच्यावरील हल्ल्याचा जाब विचारायला गेलेल्या मामाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 12:11 AM2021-07-21T00:11:59+5:302021-07-21T00:15:38+5:30

Murder भाच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना जाब विचारला म्हणून त्यांनी मामाची हत्या केली. सोमवारी रात्री ९.३० च्या सुमारास यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धम्मदीपनगरात ही थरारक घटना घडली.

Murder of uncle who went to ask for attack on niece | भाच्यावरील हल्ल्याचा जाब विचारायला गेलेल्या मामाची हत्या

भाच्यावरील हल्ल्याचा जाब विचारायला गेलेल्या मामाची हत्या

Next
ठळक मुद्देदोन दिवसापूर्वी केला होता भाच्यावर हल्ला - धम्मदीपनगरात तणाव

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - भाच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना जाब विचारला म्हणून त्यांनी मामाची हत्या केली. सोमवारी रात्री ९.३० च्या सुमारास यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धम्मदीपनगरात ही थरारक घटना घडली. अतुल रामकृष्ण धकाते (वय ३२) असे मृताचे नाव आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, अतुलचा भाचा पीयूषसोबत १८ जुलैला आरोपी तुषार वर्मा, मनीष शाहूसोबत पैशाच्या व्यवहारातून वाद झाला. यावेळी आरोपीच्या हल्ल्यात पीयुष जखमी झाला. त्याला दवाखान्यात दाखल केल्यानंतर अतुल धकातेने आरोपी तुषार आणि मनीषला मारहाणीचे कारण विचारले. आरोपींनी तुषारसोबतही वाद घालून त्याचा मोबाईल फोडला. त्यानंतर अतुल घराकडे आला तर आरोपी त्यांच्या मित्राकडे गेले. त्यांनी घातक शस्त्रे सोबत घेऊन अतुलच्या घराकडे धाव घेतली. तो बाहेरच उभा होता. आरोपी तुषार, मनीष आणि त्यांच्या साथीदारांनी अतुलवर घातक हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. गंभीर अवस्थेत अतुलला रुग्णालयात नेले असता मंगळवारी उपचारादरम्यान अतुलचा मृत्यू झाला. यामुळे परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले.

पाच आरोपी गजाआड

त्यामुळे यशोधरानगर पोलिसांनी मंगेश रामकृष्ण धकाते (वय ३५) यांची तक्रार नोंदवून घेत आरोपी

तुषार धनराज वर्मा (वय १९, रा. कळमना), सुनील शिवलाल सारंगपुरे (वय २०, रा. कळमना), मनीष ऊर्फ डब्ल्यू कमल शाहू (वय १९), अंकितकुमार नेमीचंद्र इवनाते (वय १९) आणि भोलेश्वर ऊर्फ पप्पू श्याम निर्मलकर (वय २१, रा. धम्मदीपनगर) यांना अटक केली.

Web Title: Murder of uncle who went to ask for attack on niece

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.