पोटच्या मुलीवर जबरदस्ती करणाऱ्याची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:09 IST2021-01-19T04:09:11+5:302021-01-19T04:09:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - दारूच्या नशेत पोटच्या विवाहित मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या एका इसमाला मुलीच्या दिराने मारहाण करून ...

पोटच्या मुलीवर जबरदस्ती करणाऱ्याची हत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - दारूच्या नशेत पोटच्या विवाहित मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या एका इसमाला मुलीच्या दिराने मारहाण करून त्याची हत्या केली. पिपळा हुडकेश्वर भागात रविवारी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली. हरिलाल मोहनलाल गोस्वामी (वय ५५) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी नितीन नत्थूलाल सोळंकी आणि राजू हरिलाल राठोड या दोघांना ताब्यात घेतले.
मृत गोस्वामी हा मूळचा असिनपूर (लखनऊ, उत्तरप्रदेश) येथील रहिवासी होय. त्याच्या बहिणी नागपुरात राहतात. त्यांच्या ओळखीतूनच त्याच्या मुलीचे लग्न नागपुरात झाले होते. मुलगी सुमन (काल्पनिक नाव) मानसिकरीत्या कमकुवत आहे. तिचा पती आणि त्याचे कुटुंबीय लॉकडाऊनपूर्वी गल्लोगल्ली फिरून चादर विकत होते. लॉकडाऊनमुळे रोजगार बुडाल्याने ते आता हातमजुरी करतात. लॉकडाऊनच्या दरम्यान गोस्वामी मुलीच्या घरी आला होता. काचेच्या वस्तू बनवून तो विकायचा. हा व्यवसाय चांगला चालत असल्याने तो मुलीच्याच घरी राहू लागला