नागपुरात प्रिटींग प्रेसच्या मालकाची हत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 23:49 IST2019-02-27T23:48:55+5:302019-02-27T23:49:47+5:30

एका ३६ वर्षीय प्रिंटींग प्रेस मालकाची हत्या करण्यात आली. ही घटना हुडकेश्वर आऊटर रिंग रोडवर घडली. मृतदेह रस्त्याच्या काठावर फेकून हा अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मंगळवारी रात्री ही घटना घडल्याचा अंदाज आहे.

The murder of the owner of the printing press in Nagpur | नागपुरात प्रिटींग प्रेसच्या मालकाची हत्या 

नागपुरात प्रिटींग प्रेसच्या मालकाची हत्या 

ठळक मुद्देहुडकेश्वर आऊटर रिंग रोडवर मिळाला मृतदेह : डोक्यावर गंभीर वार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका ३६ वर्षीय प्रिंटींग प्रेस मालकाची हत्या करण्यात आली. ही घटना हुडकेश्वर आऊटर रिंग रोडवर घडली. मृतदेह रस्त्याच्या काठावर फेकून हा अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मंगळवारी रात्री ही घटना घडल्याचा अंदाज आहे.
संजय धनराज चव्हाण रघुजीनगर क्वॉर्टर नं. ५/१२६ असे मृताचे नाव आहे. संजयची गणेशपेठ येथे प्रिंटींग प्रेस आहे. मंगळवारी रात्री ९.३० वाजता संजय घरातून बाहेर पडला. तेव्हापासून तो घरी परत आला नव्हता. हुडकेश्वर पोलिसांना बुधवारी पहाटे २ वाजता रिंग रोडवर ओरिएंटल कंपनीजवळ रस्त्यावर अपघात झाल्याची सूचना मिळाली. संजय रस्त्याच्या काठावरील नालीत मृतावस्थेत आढळून आला. त्याची तपासणी केली असता संजयच्या डोक्यावर शस्त्राने वार केल्याचे उघडकीस आले. संजयची हत्या कुणी व का केली याचा शोध घेतला जात आहे. मृताचा भाऊ अजय चव्हाण यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे

Web Title: The murder of the owner of the printing press in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.