क्षुल्लक कारणावरून एकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:19 IST2021-01-13T04:19:00+5:302021-01-13T04:19:00+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : दारू पिण्यासाठी पाणी न दिल्याने चिडलेल्या दाेघांनी वचपा घेण्यासाठी एकावर चाकूने हल्ला चढविला. दाेघांनीही ...

क्षुल्लक कारणावरून एकाचा खून
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : दारू पिण्यासाठी पाणी न दिल्याने चिडलेल्या दाेघांनी वचपा घेण्यासाठी एकावर चाकूने हल्ला चढविला. दाेघांनीही त्याच्या पाेट व पायावर चाकूने वार केले. त्यात त्याचा मृत्यू झाला. पळून गेलेल्या आराेपींना पाेलिसांनी पाच तासात इतवारी नागपूर रेल्वेस्थानक पिरसरातून अटक केली. घटना कामठी शहरात शनिवारी (दि. ९) सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली.
कुंदन देवाजी रंगारी (४०, रा. चित्तरंजन नगर, झाेपडपट्टी, कामठी) असे मृताचे तर करण शंकर वानखेडे (२३, रा. चित्तरंजन नगर, झोपडपट्टी, कामठी) व रोशन ऊर्फ तंट्या राजू लारोकर (२४, रा. पार्वतीनगर, कळमना, नागपूर) अशी आराेपींची नावे आहेत. दाेन्ही आराेपी सराईत गुन्हेगार असून, मित्र आहेत. दाेघेही शुक्रवारी (दि. ८) रात्री दारू प्यायले हाेते. त्यांनी पुन्हा दारू पिण्यासाठी कुंदनला पाणी मागितले. कुंदनने मात्र पाणी देण्यास नकार दिला. हा राग त्या दाेघांच्याही मनात हाेता.
दरम्यान, कुंदन सकाळी चहा पिण्यासाठी घरून पायी बसस्थानकाच्या दिशेने निघाला हाेता. करण व राेशन त्याच्या मागावरच हाेते. ताे स्वामी विवेकानंद अनाथालयासमाेर येताच दाेघांनी त्याला पकडले आणि सावरण्याच्या आत त्याच्या पाेट व पायावर चाकूने वार केले. गंभीर दुखापत झाल्याने कुंदन खाली काेसळताच दाेघांनी तिथून पळ काढला. परिसरातील नागरिकांनी त्याला लगेच शहरातील उपजिल्हा रुग्णालयात नेले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घाेषित केले. पाेलिसांनी दाेघांनाही इतवारी नागपूर रेल्वेस्थानक परिसरातून ताब्यात घेत अटक केली. याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी भादंवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास ठाणेदार संजय मेंढे करीत आहेत.
....
सराईत गुन्हेगार
आराेपी करण व राेशन सराईत गुन्हेगार असून, दाेघांच्या विराेधात कामठी (नवीन) पाेलीस ठाण्यात गुन्ह्यांची नाेंद आहे. शिवाय, दाेघेही व्यसनाधीन आहेत. कुंदनला डाॅक्टरांनी मृत घाेषित करताच त्याच्या नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयातच्या आवारात गर्दी केली हाेती. पाेलीस उपायुक्त नीलाेत्पल यांनी घटनास्थळ व रुग्णालयाची पाहणी केली. खून केल्यानंतर दाेघांनीही कामठी-कळमना मार्गावरील कळमना टी पॉईंट चॉकातून ऑटोने इतवारी रेल्वेस्थानक गाठले. ते रेल्वेस्थानक परिसरातून बाहेर पडत असतानाच पाेलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.