दोन नगरसेवकांसह नऊ जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा

By Admin | Updated: June 23, 2014 01:14 IST2014-06-23T01:14:41+5:302014-06-23T01:14:41+5:30

माजी मिनी महापौर (झोन सभापती) फैमिदा नसरीन यांचे पती हबीब शहा ऊर्फ हब्बू (४८) यांच्यावर सशस्त्र हल्ला करुन त्यांची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी नागपुरी गेट पोलिसांनी माजी उपमहापौर तथा

Murder of nine people with two corporators | दोन नगरसेवकांसह नऊ जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा

दोन नगरसेवकांसह नऊ जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा

एका आरोपीला अटक : माजी मिनी महापौरांच्या पतीची हत्याप्रकरण
अमरावती : माजी मिनी महापौर (झोन सभापती) फैमिदा नसरीन यांचे पती हबीब शहा ऊर्फ हब्बू (४८) यांच्यावर सशस्त्र हल्ला करुन त्यांची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी नागपुरी गेट पोलिसांनी माजी उपमहापौर तथा नगरसेवक शेख जफर शेख जब्बार (४०,रा. नमुना), नगरसेवक अब्दुल रफीक ऊर्फ रफ्फु पत्रकार (रा.हैदरपुरा) यांच्यासह नऊ जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करुन शहाबाज हुसेन बशीर हुसेन (३५, रा. आझादनगर ) या आरोपीला अटक केली आहे.
हबीब शहा हत्याप्रकरणी पोलिसांनी माजी उपमहापौर तथा नगरसेवक शेख जफर शेख जब्बार, नगरसेवक अब्दुल रफीक ऊर्फ रफ्फु तसेच आसीफ काल्या, हब्बु बनजोटा, लच्छु, अकील भंगारवाला, नईम, शाकीर हुसेन, शहाबाज हुसेन या नऊ जणांविरुध्द नागपुरी गेट पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ३२५ आर्म्स अ‍ॅक्ट कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले. यातील शहाबाज हुसेन याला अटक करण्यात आली. या हल्लेखोरांनी जुन्या वैमनस्यातून हबीब शहा यांच्यावर सशस्त्र हल्ला चढवून हत्या केल्याची तक्रार मृताचा भाऊ रशीद शहा यांनी पोलिसात दाखल केली होती.
प्रभाग क्र. ३० च्या नगरसेविका तथा माजी मिनी महापौर (झोन सभापती) फैमिदा नसरीन यांचे पती हबीब शहा हे शनिवारी त्यांच्या घरासमोर खुर्च्या टाकून बसले होते. तेथे सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास सात ते आठ हल्लेखोर आले व त्यांनी हबीब शहा यांच्यावर चाकू व तलवारीने हल्ला केला.
हबीब शहा यांच्यावर हल्ला होत असताना त्यांचा भाऊ रशीद शहा बशीर शहा (३०) व भाचा जावेद शहा (२५, दोन्ही रा. नुरानी चौक) या दोघांनी त्यांच्या बचावासाठी मध्यस्ती केली.
परंतु हल्लेखोरांनी त्यांच्यावरही हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले. घटनेची माहिती नागपुरी गेट पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान हबीब शहा यांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)

Web Title: Murder of nine people with two corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.