नागपुरात डिजेच्या वादात अल्पवयीन तरुणाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 23:49 IST2021-01-08T23:48:55+5:302021-01-08T23:49:49+5:30
Murder of a minor, crime news कळमनाअंतर्गत डिप्टी सिग्नल वस्तीत जुना वाद आणि डिजेच्या कारणावरून एका अल्पवयीन मुलाची चाकुने वार करून हत्या करण्यात आली.

नागपुरात डिजेच्या वादात अल्पवयीन तरुणाची हत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कळमनाअंतर्गत डिप्टी सिग्नल वस्तीत जुना वाद आणि डिजेच्या कारणावरून एका अल्पवयीन मुलाची चाकुने वार करून हत्या करण्यात आली. शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. विनय राजेश डहारे (१६) असे मृतकाचे नाव आहे. या गुन्ह्यात कळमना पाेलिसांनी याेगेश वंजारे (२०) व त्याच्या दाेन अल्पवयीन साथीदारांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मृतक विनयचा काही दिवसांपूर्वी डिजेमध्ये नाचण्याच्या कारणावरून घटनेतील अल्पवयीन मुलांशी वाद झाला हाेता. यामुळे त्यांच्यामध्ये धुसफुस चालली हाेती. विनयने ही बाब गंभीरतेने घेतली नाही. आज दुपारीही त्यांच्यामध्ये वाद झाला. विनयच्या मित्रांनी याबाबत पाेलिसांत तक्रार दाखल करण्याची सुचना केली हाेती पण त्याने तक्रार करण्याएवजी तिथेच वाद मिटविण्यावर भर दिला. रात्री ९ वाजताच्या दरम्यान याेगेश वंजारे व त्याच्या अल्पवयीन साथीदारांनी विनयला शितला माता मंदिराजवळ थांबविले आणि भांडणास सुरुवात केली. याचवेळी आराेपींना विनयवर चाकुने हल्ला केला. पाेट व छातीवर वार करून गंभीर जखमी केले.
नागरिकांनी विनयला त्वरीत रुग्णालयात दाखल केले पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. घटनेची माहिती मिळताच झाेन ५ चे डिसीपी निलाेत्पल आणि कळमना पाेलिसांचे पथक घटनास्थळावर पाेहचले. चाैकशीच्या आधारे तिन्ही आराेपींना अटक करण्यात आली. त्यांची रात्री उशीरापर्यंत चाैकशी सुरू हाेती.