कुख्यात गोल्डी शंभरकरची हत्या; साथीदारांनीच केला गेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2021 16:23 IST2021-10-21T16:22:34+5:302021-10-21T16:23:48+5:30

गेल्या काही दिवसांपासून हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार जहांगीर खान आणि मृतक गोल्डी यांच्यात अमली पदार्थाच्या व्यवहारातून वाद निर्माण झाला होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर, ही हत्या झाल्याचे सांगितले जाते.

The murder of the infamous Goldie Shambharkar; | कुख्यात गोल्डी शंभरकरची हत्या; साथीदारांनीच केला गेम

कुख्यात गोल्डी शंभरकरची हत्या; साथीदारांनीच केला गेम

ठळक मुद्देअमली पदार्थाच्या व्यवहारातून घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पाचपावलीतील कुख्यात गुन्हेगार गोल्डी शंभरकर याची त्याच्या साथीदारांनी गुरुवारी सकाळी निर्घुन हत्या केली. अमली पदार्थाच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचे सांगितले जाते.

या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार जहांगीर खान आणि मृतक गोल्डी हे दोघे मित्र होते. गेल्या काही दिवसांपासून हे दोघेही अमली पदार्थाच्या विळख्यात अडकले होते. यांच्यात त्यावरुन वाद निर्माण झाला होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर, आरोपी जहांगीर खान तसेच त्याचे साथीदार शाकीर खान, फय्याज आणि नियाज यांनी गुरुवारी सकाळी ९.३० च्या सुमारास गोल्डी शंभरकर याला त्याच्या घरापासून काही अंतरावर नेले आणि चाकूचे घालून रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. माहिती कळाल्यानंतर पाचपावली पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गोल्डीला मेयोत नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

गुरुवारी सकाळी झालेल्या या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली. माहिती कळताच पाचपावलीचा पोलीस ताफा तसेच उपायुक्त लोहित मतानी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाचपावली पोलिसांकडून माहिती घेतल्यानंतर मतानी यांनी आरोपींना शोधण्यासाठी वेगवेगळ्या भागात पथके रवाना केली. वृत्त लिहिस्तोवर आरोपी पोलिसांना मिळाले नव्हते.

Web Title: The murder of the infamous Goldie Shambharkar;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.