शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

नागपुरात लग्नास विरोध करणाऱ्या भावाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 10:19 AM

विवाहितेसोबत लग्न करण्याचे मनसुबे पूर्ण होत नसल्याचे पाहून एका गुंडाने राहुल शंकर तुरकेल (वय ३०, रा. भोलेबाबानगर) या तरुणाची हातोड्याने ठेचून हत्या केल्याची घटना येथे घडली.

ठळक मुद्देनातेवाईकानेच केला घात नंदनवनमध्ये थरार, आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: विवाहितेसोबत लग्न करण्याचे मनसुबे पूर्ण होत नसल्याचे पाहून एका गुंडाने राहुल शंकर तुरकेल (वय ३०, रा. भोलेबाबानगर) या तरुणाची हातोड्याने ठेचून हत्या केल्याची घटना येथे घडली. हत्या केल्यानंतर आरोपीने रक्ताच्या थारोळ््यातील मृतदेह असलेल्या खोलीला कुलूप लावून पळ काढला. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खरबी, गाडगेनगरात रविवारी दुपारी ही घटना घडली. रितेश दीपक सिकलवार (वय २५, रा. गाडगेबाबानगर) असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.आरोपी रितेश आणि मृतराहुल नातेवाईक होत. रितेश राहुलच्या विवाहित चुलत बहिणीवर एकतर्फी प्रेम करतो. त्याने वर्षभरापूर्वी तिच्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, त्याची गुन्हेगारी वृत्ती लक्षात घेत नातेवाईकांनी त्याला नकार दिला. त्यानंतर त्या तरुणीचे दुसºया तरुणासोबत लग्न लावून दिले. तरी रितेश विवाहितेसोबत वारंवार लग्न करण्याचा तगादा लावत होता. याच कारणावरून आठवडाभरापूर्वी त्याचा राहुलसोबत वाद झाला होता. वारंवार समजूत काढूनही तो ऐकायला तयार नसल्याने विवाहितेच्या कुटुंबात कलह वाढू शकतो, हे ध्यानात घेऊन गेल्या आठवड्यात राहुलने रितेशचे कान शेकले होते. मात्र, रितेशवर त्याचा फरक पडला नाही. तीन दिवसांपूर्वी रितेश राहुलच्या विवाहित बहिणीच्या घरी गेला आणि त्याने तिच्यासोबत लग्न करण्याचा हट्ट धरला. यावेळी राहुलच्या बहिणीनेही त्याची समजूत काढून हे शक्य नसल्याचे सांगत त्याला परत पाठविले.जिच्यावर प्रेम आहे, तिच्यासोबत लग्न करण्यात सर्वात मोठा अडथळा राहुल असल्याची भावना झाल्याने त्यालाच मार्गातून हटविण्याचा कट रचला. रविवारी दुपारी रितेशने राहुलला शोधले. आपण पार्टी करू, असे म्हणत त्याला स्वत:च्या घरी नेले. तेथे दोघे यथेच्छ दारू पिले. जेवण करताना आरोपी रितेशने पुन्हा राहुलच्या बहिणीसोबत लग्नाचा विषय काढला. राहुलने नकार देताच तयारीत असलेल्या रितेशने त्याच्या जवळचा हातोडा काढला अन् डोक्यावर एकापाठोपाठ एक फटके मारले. राहुल रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. तो ठार झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याचा मृतदेह तसाच ठेवून आरोपीने त्या खोलीला कुलूप लावले अन् बाहेर पळून गेला. आरोपी रितेशचे आई-वडील सायंकाळी घरी परतले तेव्हा हा प्रकार उघड झाला. त्यानंतर नंदनवन पोलिसांना कळविण्यात आले. त्यानुसार, नंदनवनचा ताफा आणि पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. त्यांनी लगेच आरोपीची शोधाशोध करून रितेशला अटक केली.

आईचा आधार गेलाराहुलला वडील नाहीत. त्याच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर त्याला अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळाली होती. राहुलने दोन बहिणींचे लग्न करून त्यांचे कुटुंब बसवले होते तर, आता तो विधवा आईचा एकमात्र आधार होता. त्याची हत्या झाल्याने त्याच्या आईला जबर मानसिक धक्का बसला आहे.

टॅग्स :Murderखून