मेहुण्याने केली जावयाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:08 IST2020-11-28T04:08:59+5:302020-11-28T04:08:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : घरगुती वादातून मेव्हण्याने त्याच्या जावयाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून त्यांची हत्या केली. गुरुवारी रात्री ...

Murder to be committed by Mehunya | मेहुण्याने केली जावयाची हत्या

मेहुण्याने केली जावयाची हत्या

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : घरगुती वादातून मेव्हण्याने त्याच्या जावयाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून त्यांची हत्या केली. गुरुवारी रात्री १०.३० च्या सुमारास पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. अतुल धरमदास सहारे (वय ५८) असे मृताचे नाव आहे. ते कुंभारपुऱ्यातील बारसे नगरात राहत होते. त्यांचा मेव्हणा आरोपी विकास गुणवंत साखरे (वय ३२) यांच्यासोबत गुरुवारी रात्री अतुल यांचा वाद सुरू झाला. दोघे एकमेकांना अश्लील शिवीगाळ करू लागले. पाहता पाहता ते हाणामारीवर आले. आरोपी विकास साखरेने अतुल सहारे यांना खाली पडले आणि त्यांच्या तोंडावर, पोटावर, छातीवर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून त्यांना ठार मारले. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली. माहिती कळताच पाचपावली पोलीस घटनास्थळी पोहोचले. राजेश अतुल सहारे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विकास साखरे विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

---

Web Title: Murder to be committed by Mehunya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.